MPSC Exam News : Sarkarnama
मुंबई

MPSC Exam News : मोठी बातमी|MPSC ने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; नवे वेळापत्रक कधी?

Chetan Zadpe

Mumbai News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत एप्रिल-मे महिन्यांत होऊ घातलेल्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि समाज कल्याण अधिकारी (गट-ब), इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (गट-ब) या सरळसेवा चाळणीच्या परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, असे आयोगाडून सांगण्यात आले आहे. (Latest Marahi News)

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमपीएसीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, अशी कुजबूज सुरू होती. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. आता मात्र निवडणुकांची पार्श्वभूमी असली तरी आरक्षणाचे कारण पुढे करत राज्य या परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात आयोगाने आज (दि. 21 मार्च) गुरुवारी परिपत्रकाद्वारे माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या परिपत्रकानुसार 28 एप्रिलला पार पडणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तसेच 19 मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी (गट-ब) आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (गट-ब) या सरळसेवा चाळणी परीक्षा (EXam) आता पुढे ढकललेल्या आहेत.

सामाजिक मागासवर्ग आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम 2024 च्या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता, राज्य सरकारकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा करण्यात येतील, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. (MPCS News)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT