Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढाईत एकनाथ शिंदे कोकणात वरचढ...

Mumbai Assembly Election Konkan Thane Sindhudurg Eknath Shinde ShivSena MVA ShivSenaUBT Mahayuti : विधानसभा निवडणुकीला कोकण आणि ठाण्यात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशा लढाईत एकनाथ शिंदे वरचढ ठरले आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : लोकसभा निडवणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीने वर्चस्व कायम राखले. कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग इंथ शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशा लढाईत एकनाथ शिंदे वरचढ ठरले.

महाविकास आघाडी आणि त्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रत्येक राजकीय हत्यार एकनाथ शिंदेंसमोर निष्प्रभ ठरला. महायुतीने इथं 35 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला अवघ्या चार जागांवर विजय मिळवता आला. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पुरता घायाळ झालेला दिसला.

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या आठ, भाजपच्या चार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून आल्या. गुहागरची जागा सोडल्यास इतर सर्व जागा महायुतीने जिंकल्या. राजापूर आणि कुडाळ ही जागा महायुतीने खेचून घेतली. कर्जत आणि उरणमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी झाल्या. महाडमधून भरत गोगावले, पेणमधून रविशेठ पाटील, पनवेलमधून प्रशांत ठाकूर, उरणमधून महेस बालदी, कर्जतमधून महेंद्र थोरवे विजयी झाली.

रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत विजयी झाले. बाळ सामंत यांची शिवसेनायुबीटीचे खेळी फसली. राजापूरमध्ये राजन साळवी यांचा पराभव झाला. योगेद कदम पुन्हा विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले. गुहागरमध्ये भास्कर जाधव जिंकले. सिंधुदुर्गमध्ये राणे कुटुंबाने आपले वर्चस्व सिद्ध केले. कुडाळमधून नीलेश राणे जिंकले. कणकवलीतून भाजपचे (BJP) नीतेश राणे जिंकले. सांतवडीमध्ये राजन तेली यांचा पाडाव दीपक केसरकर यांनी अलगद केला.

ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी 16 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. भाजपने नऊ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर यश मिळवले. महाविकास आघाडीने जिंकलेल्या दोन जागांपैकी शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि मनसेला एकही जागा मिळाली नाही. भाजपचे महेश चौगुले, किसन काथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, रवींद्र चव्हाण, नरेंद्र मेहता, संजय केळकर, गणेश नाईक, मंदा म्हात्रे विजयी झाले. शिवसेना पक्षाचे शांताराम मोरे, बालाजी किणीकर, विश्वानाथ भोईर, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजेश मोरे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे दौलत दरोडा विजयी झाले.

पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच जागांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले. इथं बहुजन विकास आघाडीचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले. या पक्षाचा इथं 35 वर्षांपासून असलेला दबदबा संपुष्टात आला. माकपचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी डहाणूची जागा राखण्यात यश मिळवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT