Sanjay Raut : 'गरज सरो, वैद्य मरो'; काय आहे राऊतांची 'भविष्यवाणी'!

MP Sanjay Raut mahayuti BJP Delhi Chief Minister ShivSena Eknath Shinde : महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच रंगली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात महायुतीला 236 जागा मिळल्या असून, मुख्यमंत्रीपदाबाबत आता उत्सुकता वाढली आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीमधील तिन्हीप्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत रस नसल्याचे म्हटले होते.

आता मात्र मुख्यमंत्री पदावरून खल सुरू झाला आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर डिवचलं आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर तीन ओळींचे मुख्यमंत्रीपदाबाबत पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डिवचलं आहे. गरज सरो वैद्य मरो! दिल्लीत निर्णय झाला. भाजप आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत नाही. आता काय? असा प्रश्न केला आहे.

Sanjay Raut
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा अपयशानंतर ठाकरेंच्या दोन शिलेदारांची खासदारकी धोक्यात?

राज्यात महायुतीला सर्वाधिक 236 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपला (BJP) 132 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 13 आमदारांचा पाठिंबा हवा आहे. म्हणजेच, महायुतीमधील इतर दोन पक्षांची एकप्रकारे भाजपला गरज देखील नसणार आहे. भाजपचे हे यश म्हणजे, महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला हादरला आहे.

Sanjay Raut
Mahim Assembly Election Results : मोठी बातमी! माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पिछाडीवर

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीच्या यशानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले. राज्यात वेगळे राजकारण खेळले. आता बहुमताजवळ असलेला भाजप मुख्यमंत्रीपदाबाबत कोणता निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत भाजपचे नेते घेत आहे. यासाठी महायुतीमधील इतर पक्षांच्या प्रमुखांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु महायुतीत भाजपच्या जागांचा वाढता क्रम पाहता मुख्यमंत्रीपदावर भाजपचाच दावा असणार असे सध्याचे तरी चित्र आहे. परंतु राजकीय निर्णयात वेगळेपणा ठेवण्यात भाजपचा हातखंडा राहिला आहे. त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यातच संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचलं आहे. भाजपचा निर्णय झाला असून, पुढे आता काय? असा प्रश्न करून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com