Uddhav Thackeray News : ठाकरेंच्या मक्तेदारीला सुरूंग, मुंबईत भाजप महायुतीचा झेंडा

Uddhav Thackeray ShivSena supremacy Mumbai BJP mahayuti assembly elections : विधानसभा निवडणुकीने मुंबईवर कोणाचे वर्चस्व असेल, हे सिद्ध केले असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मक्तेदारीला धक्का बसला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई किसकी? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. भाजप महायुतीने ठाकरेंच्या मक्तेदारीला सुरूंग लावला आहे.

मुंबईवर भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय. महायुतीला मुंबईत 22 जागा जिंकल्या असून, त्यात भाजपला 15 जागा यश मिळाले आहेत. या यशाबरोबर भाजपने लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा शिक्का पुसून टाकला आहे.

मुंबईत 36 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघापैकी 22 जागांवर महायुतीने यश मिळवले आहे. यात 22 जागापैंकी भाजपने 15, तर सहा जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने जिंकल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीने मुंबईत 14 जागांवर यश मिळवले आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने दहा जागा जिंकल्यात. काँग्रेसने तीन, तर समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली आहे.

Uddhav Thackeray
Sanjay Raut : 'गरज सरो, वैद्य मरो'; काय आहे राऊतांची 'भविष्यवाणी'!

मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे (BJP) मंगलप्रभात लोढा सातव्यांदा विजयी झालेत. त्यांना 72 टक्क्यांहून अधिक मते मिळालीत. कालिदास कोळंबकर नायगावमधून नवव्यांदा विजयी झाले. मुंबईचे भाजपचे शहराध्यक्ष आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 19 हजार 931 मते घेत जिंकले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कांदिवलीतून अतुल भातखळवकर, चारकोपमधून योगेश सागर, विलेपार्लेतून पराग अळवणी, गोरेगावमधून विद्या ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सना मलिक यांच्या रुपाने मुंबईत एकच जागा जिंकता आली.

Uddhav Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा अपयशानंतर ठाकरेंच्या दोन शिलेदारांची खासदारकी धोक्यात?

काँग्रेसचे मालाड पश्चिममधून अस्लम शेख, धावीतून ज्योती गायकवाड, मुंबादेवीतून अमीन पटेल विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दहा जागांवर विजय मिळवला आहे. माहीम, शिवडी आणि वरळीमध्ये अटीतटीची लढत झाली. वरळीत आदित्य ठाकरे यांनी नेटाने निवडणूक लढली. परिणामी ते विजयी झाले. माहीममध्ये महेश सावंत यांनी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांना हरवले. शिवडीमधून अजय चौधरी यांचा विजय झाला. वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई यांनी विजय मिळवला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून चांदिवली मतदारसंघातून दिलीप लांडे, मागाठाणेतून प्रकाश सुर्वे यांचा विजय झाला. दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचा पराभव झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघात पराभवाला समोरे जावे लागले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते. महायुतीचे उमेदवार पियूष गोयल उत्तर मुंबईतून, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे वायव्य मुंबईतून विजयी झाले होते. महाविकास आघाडीने सहापैकी चार जागांवर यश मिळवले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने अपयश धुऊन काढत मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मक्तेदारीला सुरूंग लावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com