Mumbai crime news : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई ATSने माहिम येथून बाईक रायडर मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (वय 33) याला ATSने अटक केली आहे. या कारवाईने बाईक रायडर म्हणून काम करणाऱ्या कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
ATSच्या पथकाला मोबाईल मोहम्मदच्या फोनची तपासणी केली असता, त्यामध्ये चिथावणीखोर पोस्ट आणि मसूद अझहरचे ऑडिओ क्लिप आढळल्याची आहे. मोहम्मद हसन हा माहिम मेट्रो स्टेशनजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरात राहत होता. रायडर म्हणून काम करण्याबरोबरच तो इत्र अन् अत्तर विक्रीचे काम करतो.
ATS गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) संवेदनशील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. यात रॅपिडो बाईक रायडर यांच्या हालचालींवर संशय होता. मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याच्यावर मुंबई ATS लक्ष ठेवून होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी त्याचा कथित संपर्क होता का? याचाही तपास सुरू होता. पुढे सोशल मीडियावरील त्याच्या हालचाली आणि एका टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला.
ATSच्या काळाचौकी युनिटने मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट आढळल्या. जिहादचे समर्थन करणारे संदेश आणि जैश प्रमुख मसूद अजहरच्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप्स सापडून आल्या.
ATSच्या पथकाने अधिक तपास सुरू केल्यावर, मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर हा पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर आली. रायडर, इत्र अन् अत्तर विक्रीच्या व्यवसायाच्या आडून तो विखारी विचार पसरवत असल्याचेही ATSच्या पथकाच्या तपासात समोर आले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याने, तो देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय होता का? याचा तपास आता ATSचे पथक करत आहे.
या प्रकरणी एटीएसच्या काळाचौकी युनिटने आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 196(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार, धर्म, भाषा किंवा अन्य कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृत्यांशी संबंधित गुन्ह्यांवर कारवाई केली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.