Pradeep Purnekar murder investigation : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; पिस्तुले यूपीमधून, तर चॉपर मुंबईतून खरेदी

Police probe reveals alleged source weapons used Pradeep Purnekar murder case, while investigators examine video linked alleged firearms training Mulshi : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांना अटक; शस्त्रांच्या खरेदीचा तपशील समोर. मुळशीतील कथित बंदूक प्रशिक्षणाच्या व्हिडिओच्या अनुषंगाने एसआयटीकडून पुढील तपास.
Pradeep Purnekar latest update
Pradeep Purnekar latest updateSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar murder case weapons : ठाणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेली दोन्ही देशी पिस्तुले उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आली होती, तर हल्ल्यासाठी वापरलेले चॉपर मुंबईतील चोरबाजारातून विकत घेतल्याचे तपासात उघड झाले.

या तीन चॉपरची एकूण किंमत 200 ते 250 रुपये असल्याची माहिती आरोपींनी तपासादरम्यान दिल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ही शस्त्र खरेदीसाठी पैसा कोठून आणि कोणी उपलब्ध करून दिला, हे देखील लवकरच तपासात समोर येईल.

प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) आतापर्यंत पाच जणांना अटक केली. तसेच तपासात पोलिसांना दोन पिस्तूल, दोन चॉपर, मोबाईल, आणि चार वाहनांसह दुचाकी हस्तगत करण्यात यश आले. याचदरम्यान, या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांच्या खरेदीचा तपशील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

गोळीबारासाठी देशी पिस्तुलांची उत्तर प्रदेशातून प्रत्येकी 15 हजार रुपयांमध्ये वैयक्तिक कारणास्तव खरेदी केली, तर चॉपरची मुंबईतील (Mumbai) चोरबाजारातून खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य पुराव्यांच्या आधारे एसआयटीकडून पुढील तपास सुरू आहे.

Pradeep Purnekar latest update
Pradeep Purnekar latest update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; SIT कडून पिस्तूल अन् दोन चाकू जप्त

प्रदीप पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या दोन व्हिडिओंच्या अनुषंगाने राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने चौकशी केली. राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत नऊहून अधिक वेळा चौकशी झाली आहे.

Pradeep Purnekar latest update
Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; जुन्या वैमनस्यातून हत्या, सूत्रधाराचा शोध सुरूच

यातील एका व्हिडिओमध्ये आरोपी निखिल यादव आणि राजेंद्र शिंदे बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानुसार, एसआयटी पथक लवकरच मुळशी येथे जाऊन संबंधित ठिकाणाची माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com