Ameet Satam corruption allegation Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray BMC scam : मुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार; अमित साटम यांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा!

Ameet Satam Accuses Uddhav Thackeray of Biggest BMC Corruption Mumbai BJP : मुंबईचे भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या साम मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Ameet Satam corruption allegation : मुंबई महापालिकेतील देशातील सर्वात मोठा तीन लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत मुंबई भाजप शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी खळबळ उडवून दिली. हा भ्रष्टाचाराचा आरोप करताना, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांनी थेट निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबई महापालिकेची 25 वर्ष सत्ता होती. त्यामुळे या भ्रष्टाचारामागे थेट उद्धव ठाकरेंच आहेत, असा घणाघात देखील आमदार अमित साटम यांनी केला.

मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या साम मराठी वृत्तवाहिशी 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट'मध्ये संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील तीन लाख रुपयांच्या भ्रष्टाचारावर भाष्य करताना, उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.

भाजपचे (BJP) अमित साटम म्हणाले, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमच्याबरोबर आहे. 1997 ते 2022 दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्षे वर्चस्व राहिले आहे. एक प्रकारे मुंबई महापालिकेवर त्यांनी राज्य केले. या 25 वर्षांमध्ये देशात सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला. तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मुंबई महापालिकेच्या माध्यमातून झाला."

'मुंबईमध्ये जे काही गेल्या 11 वर्षांमध्ये बदल झाले आहेत, ते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट किंवा बीडीडी चाळीमध्ये मराठी माणसाला 500 स्क्वेअर फुटाचा घर देण्याचा प्रोजेक्ट असेल, ही सगळी कामे गेला अकरा वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली,' असा दावा अमित साटम यांनी केला.

'उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्षांमध्ये भाजप साधारणतः 20 ते 22 वर्षे वाटेकरी होता. मग या भ्रष्टाचारांमध्ये भाजप देखील कुठेतरी आहे का? यावर बोलताना साटम म्हणाले, "या 25 वर्षांमध्ये भाजपचा नगरसेवक स्टॅंडिंग कमिटीचा चेअरमन कधीच नव्हता. भाजपचा नगरसेवक हा कधीच महापौर नव्हता. एक्झिक्युटव्ह पॉवर हे महापालिका कमिशनरकडे असतात आणि स्टॅंडिंग कमिटीच्या चेअरमनकडे असतात. कोणताही प्रस्ताव आला तर तो स्टॅंडिंग कमिटीकडे जातो, त्यानंतर तो हाऊसमध्ये जातो, महापौर तिथं त्यावर निर्णय घेतो, तिथून पुढे तो प्रस्ताव हा कमिशनरकडे जातो. यामध्ये भाजपचा कार्यकर्ता कधीच नव्हता. त्यामुळे स्टॅंडिंग कमिटी ही उद्धव ठाकरे चालवायचे आणि महापौरांना देखील निर्देश हे उद्धव ठाकरेच द्यायचे."

आयुक्त तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात, यावर बोलताना अमित साटम म्हणाले, "1997 ते 2014 या काळात मुख्यमंत्री आमचा नव्हता. मुख्यमंत्र्यांना जरी आयुक्त रिपोर्ट करत असतील तरी, कार्पोरेशनमध्ये निवडून आलेल्यांची पोझिशन आहे, राजकीय नेतृत्व आहे ते निवडून आलेला आहे. महापालिकेच्या आयुक्त यांना उत्तरदायित्व असतात. वरदहस्त कोणाचा तर, ज्यांची राजकीय नेतृत्व आहे त्यांचा! त्यामुळे कार्पोरेशनला दिशा देणं, डायरेक्शन देणं, हे राजकीय पक्षाच्या नेत्याचं काम असतं. ते 25 वर्षांमध्ये व्हिजनलेस, नॉन ट्रान्सफरन्स, भ्रष्टाचार आणि त्यात व्हिजन नेसलेल्या नेतृत्व, त्या ठिकाणी होते." म्हणून आपण गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारमार्फत जो विकास झाला, तो मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होताना दिसला नाही. भविष्यात तशा प्रकारचा विकास महापालिकेच्या माध्यमातून व्हावा, महापालिकेला भ्रष्टाचार विरहीत प्रशासन मिळावे, मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर सुरक्षा सुद्धा अबाधित राहावी, असेही अमित साटम यांनी म्हटले.

मुंबई महापालिकेकडे असलेल्या ठेवींमधून पाच ते सहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या, त्यात देखील मोठा भ्रष्टाचार झाला. स्ट्रीट फर्निचर, डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रिटीकरणात झालेला भ्रष्टाचार, याकडे तुम्ही कसं बघता. यावर अमित साटम म्हणाले, "90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी या मुंबई महापालिकेच्या आहेत. हा मुंबईकरांचा पैसा आहे. हा मुंबईकरांचा पैसा त्यातील एक-दोन टक्के मुंबईकरांना सेवा देण्यासाठी वापरल्यास त्यात गैर काय?" यांनी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, यांनी 21 हजार कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले. पण मुंबई शहरांमध्ये रस्तेच कळत नाहीत. यावर कायमस्वरूपी सोल्यूशन निघावं यासाठी राज्य सरकारने कमिशनर यांना सीसी रोड करण्याचा निर्णय दिल्याकडे अमित साटम यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT