Shirdi Sai Baba fake website : शनिशिंगणापूरनंतर साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट; भक्तांबरोबर संस्थानची देखील फसवणूक

Ahilyanagar Shirdi Sai Sansthan Fake Website Scam Devotees Cheated Online : शनिशिंगणापूरनंतर शिर्डीतील साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईटद्वारे साईभक्तांची आर्थिकबरोबरच संस्थानची फसवणूक होत आहे.
Shirdi Sai Baba fake website
Shirdi Sai Baba fake websiteSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Sai Baba temple scam alert : शनिशिंगणापूर श्री शनैश्र्वर देवस्थानच्या बनावट अ‍ॅपद्वारे शनीभक्तांची फसवणुकीचा प्रकार राज्यात गाजत असतानाच, शिर्डीतील जगप्रसिद्ध साई संस्थानच्या बनावट वेबसाईटद्वारे भक्तांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

साईभक्तांची याद्वारे आर्थिक फसवणूक होत असतानाच, संस्थानला देखील याचा मोठा फटका बसला आहे. साई संस्थानने याप्रकाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी साईभक्तांकडून होऊ लागली आहे.

साई समाधी दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त शिर्डीत (Shirdi) येतात. जगभरातील साई भक्तांची हजेरी शिर्डीत असते. अनेक भाविक मुक्कामी असतात. यासाठी साई संस्थानच्या भक्त निवासाला प्राधान्य देतात. असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन खोलीचं बुकिंग करतात. मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साई संस्थान भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवली आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक (Online fraud) होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कर्नाटकमधील रामू जाधव या साई भक्ताबरोबर असाच फसवणुकीचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. रामू जाधव यांच्या नातवाचा वाढदिवस असल्याने ते कुटुंबासह साई समाधी दर्शनाला शिर्डीत येणार होते.

Shirdi Sai Baba fake website
Satyajeet Tambe Sangamner reservation issue : सत्यजीत तांबेंचा 'मास्टर स्ट्रोक'; संगमनेरमधील सर्वात जुन्या प्रश्नावर निघतोय तोडगा!

राजू जाधव यांच्या मुलाने शिर्डीत राहण्यासाठी गुगलवर जाऊन शिर्डी भक्तनिवास सर्च केल्यानंतर साई संस्थान भक्तनिवास नावाने एक वेबसाईट निदर्शनास आली. साई संस्थानची अधिकृत वेबसाई समजून त्याने खोली बुकिंगसाठी विचारणा केली असता, त्याला व्हॉट्सॲपवर एक स्कॅनर आले. त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधिताने, तुम्ही भक्त निवासाच्या काउंटरवर आल्यावर पावती देतो, असे सांगितले.

Shirdi Sai Baba fake website
Maratha Reservation: दोन खासदार वगळता काँग्रेस नेत्यांनी मराठा आंदोलनाकडे फिरवली पाठ!

रामू जाधव यांचे कुटुंब शिर्डीत साई संस्थानच्या भक्तनिवासात पोहोचल्यावर बुकिंग झाले नसल्याचे समोर आले. गोंधळलेल्या जाधव कुटुंबाला साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर रामू जाधव कुटुंबांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तसंच साई भक्तांची अशा बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक होत असल्याचा प्रकार देखील संस्थानच्या लक्षात आला.

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून या अगोदरही अनेक साई भक्तांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. रूम बुकिंग, देणगी आणि दर्शनाच्या नावाने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. साई संस्थानने या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करवी, अशी मागणी आता साईभक्तांमधून होऊ लागली आहे.

शनिशिंगणापूरचा बनावट अ‍ॅप घोटाळा तपास ठप्प

राज्यभर चर्चेत असलेला आणि विधिमंडळाच्या मागील अधिवेशनातही गाजलेला शनिशिंगणापूर देवस्थानच्या बनावट अ‍ॅप घोटाळ्याचा तपास दोन ते अडीच महिन्यांपासून ठप्प पडला आहे. तब्बल कोट्यवधी रूपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही आजवर एकाही आरोपीला या गुन्ह्यात अटक झालेली नाही. तपास केवळ सुरू आहे एवढ्यापुरतीच अधिकृत माहिती पोलिसांकडून दिली जाते. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देवस्थानच्या नावाने चार बनावट अ‍ॅप

या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. देवस्थानच्या अधिकृत परवानगीतील तीन अ‍ॅप व्यतिरिक्त आणखी चार बनावट अ‍ॅप आढळले आहेत. या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी थेट देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक खात्यात वळवला गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रकमेचा आकडा तब्बल एक कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com