BJP News Sarkarnama
मुंबई

BJP Protest Against Emergency : काँग्रेस अत्याचाराची कहाणी भाजप आज जनतेपर्यंत पोहोचविणार..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : दिवंगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 या दिवशी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभर दमनसत्र सुरू झाले. (Mumbai BJP organized a special program to protest against Emergency)

स्वातंत्र्यानंतरचा भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या समाज आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपकडून आज (रविवारी) ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरात बहुतांश ठिकाणी उद्या (ता. 25 जून) भाजपच्या वतीने आणीबाणीच्या निषेधार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई भाजपाच्या वतीने रविवारी (ता. 25) सायंकाळी 5 वा. वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात ‘आणीबाणी’च्या आठवणी, ‘आपातकाल – लोकतंत्रपर आघात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

भाजपा महामंत्री संजय उपाध्याय म्हणाले, "अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार केले होते. मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT