Mumbai rains : मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ; पहिल्याच पावसाने सरकारच्या 'कारभारा' चे काढले वाभाडे..

Who Responsible For Mumbai Flood : नालासफाई चांगल्या प्रकारे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
Mumbai rains  news
Mumbai rains news Sarkarnama

Mumbai News : "पावसाळ्यापूर्वी मुंबईत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी साचले. पावसाळापूर्व झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा नालासफाई वरून राजकारण तापताना दिसण्याची शक्यता आहे.

पाण्याने तुडुंब वाहत असलेल्या या 'कारभारा'ला कोण जबाबदार आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.

Mumbai rains  news
Uddhav Thackeray : मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसण्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..

यावेळी त्यांनी यावर्षी मुंबईकरांना नालासपाई झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच कुठलेही मुंबईकरांना त्रास देखील होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नालासफाई चांगल्या प्रकारे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

मान्सूनपूर्व पावसाने मुंबई महानगरपालिकेचे कारभाराचे वाभाळे काढल्याचे चित्र कालपासून (शनिवार) सुरु झालेल्या पावसामुळे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फेल झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले यांनी म्हटले आहे.

मुंबईतील अनेक चौकामध्ये मान्सूनपूर्व पावसाने रस्ते तुडुंब वाहताना दिसत आहे. नाला सफाई करणारा ठेकेदार, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी कि झोपलेल्या नगरविकास विभागाचं प्रशासन या साचलेल्या पाण्याला जबाबदार आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित यासंदर्भात नगरसेवकांनी आवाज उचलला असता मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्यापही राज्य सरकार घेत नाही आहे त्यामुळे या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे तात्पुरते लक्ष घालावे, असे निलेश भोसले यांनी म्हटले आहे.

Mumbai rains  news
Fadnavis Vs Thackeray : तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही ; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार ; बघूच आता..

सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी अशी टीका निलेश भोसले यांनी केली. पहिल्याच पावसामुळे मुंबईत निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक आहे. अजून पूर्ण पवासाळा बाकी आहे. पहिल्याच पावसात असं सगळं काही बघायला मिळत असल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com