Mumbai municipal election news : ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होत असताना, त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत असणार आहे. शरद पवार यांनी तशी घोषणा केली आहे. पण पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांची आता मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
'मुंबई महापालिकेत कोणत्या जागा लढवायचा, यावर आम्ही ठाकरे बंधूंना भेट घेऊन सांगितलं आहे. दोन दिवस निर्णयाचा वाट पाहू. ठाकरे बंधू न्याय देणार नसतील, तर काँग्रेसबरोबर वेगळा निर्णय घेऊ. वेळप्रसंगी स्वबळाचा निर्णय घेऊ,' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
ठाकरे बंधू मुंबई महापालिका युतीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 15 जागा द्यायला तयार आहेत. विशेष म्हणजे, दोघा ठाकरे बंधूंनी त्यांच्यात जागा वाटप निश्चित देखील केलं आहे. यावर रोहित पवार म्हणाले, "आम्ही मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून, त्यांच्याबरोबर आहोत. परंतु ते न्याय देत नसतील, तर काँग्रेसबरोबर वेगळा निर्णय घेऊ. ठाकरे न्याय देत नसतील, तर स्वबळाचा निर्णय घेऊ."
पुणे (Pune) इथं महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे, यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले, "पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. पाच ते सहा कंत्राटदारांभोवती महापालिकेचा कारभार चालतो." तोच रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. आणि आम्ही भाजपला रोखू शकतो, असेही पवार यांनी म्हटले.
मुंबई महापालिकेत भाजप एकनाथ शिंदे यांचा मराठी मतासाठी वापर करत आहेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तब्बल 110 जागा हव्या आहेत. भाजप ते काही पूर्ण करणार नाही. फक्त मराठी मतांसाठी भाजप त्यांचा वापर करून घेईल. एकनाथ शिंदे शिवसेनेला या काळात सर्वात जास्त रवींद्र चव्हाण यांच्याकडून धोका आहे. त्यांचा बुरूज ते फोडत आहे, असाही टोला रोहित पवार यांनी लगावला.
'भाजपने पालघरमध्ये काय केलं, यावर बोलताना, ज्याने पालघर हत्याकांड केलं, त्याला भाजप पक्षात घेत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे देखील कर्जत-जामखेडमध्ये तेच करत आहेत. सर्व गुंडांना तिकिटं दिली आहेत. वरिष्ठ पातळीवर जे घडत आहे, तेच खालच्या पातळीवर घडताना दिसत आहे,' असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.