

Ahilyanagar Mahanagarpalika Election News : अहिल्यानगर महापालिकेत कोणतीही उणिव राहू नये, यासाठई महाविकास आघाडीनं राजकीय गणितं जुळून आणली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी मोट बांधत जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात नेलं आहे.
यातच पुण्याप्रमाणेच अहिल्यानगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, या चर्चांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी एका वाक्यात उत्तर देत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे एकत्र येण्याची उठलेली राळ सेकंदात खाली बसली.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा होती. पुण्यासारखं राष्ट्रवादी एकत्र येतील. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर म्हणाले, "इथं असं काही होणार नाही. तसे चित्र निर्माण झाले, तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आम्ही पत्र पाठवून आमची भूमिका मांडू. इथली परिस्थिती वेगळी आहे." महाविकास आघाडी शेवटपर्यंत एकसंघ राहणार असून, भ्रष्टाचारी महायुतीविरोधात जनतेचा आवाज ठरेल, असा विश्वासही अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी अहिल्यानगर महापालिकेच्या सर्व 68 जागा लढवणार आहे. पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांची रणनीती आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्ष, पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि समविचारी पक्षांशी जुळवून घेत जागा वाटपाचे गणित जुळविले आहे. यानुसार महाविकास आघाडीची जागा वाटपाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडून खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसकडून दीप चव्हाण, शिवसेना ठाकरे पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि मनसेचे सचिन डफळ बैठकीत सहभागी झाले होते. मविआच्या 40 जागांवर तोगडा निघाला असून, 15 जागांवर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.
महाविकास आघाडी तयार करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्यासह सर्वच पक्षांचे स्थानिक नेते सकारात्मक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हालचाली गतिमान झाल्या आहेत. पहिली यादी आज जाहीर होईल, त्यात 40 जणांना उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत दुसरी यादी जाहीर होईल. एकंदरीत आगामी दोन दिवसांत सर्व जागांवरील उमेदवार जाहीर केले जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.