NCP Politics : 'खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ...' दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणामध्ये आडकाठी करणाऱ्या प्रशांत जगतापांना अजितदादांच्या आमदाराने सुनावलं

Sharad and Ajit Pawar NCP Merger : राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा देत असं झाल्यास आपण राजकारणातून काही काळ संन्यास घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता एकत्रिकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असताना जगतापांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.
Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
NCP leader Prashant Jagtap seen after meeting MP Supriya Sule in Mumbai amid controversy over Ajit Pawar–led NCP merger talks.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 24 Dec : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढणार असल्याच्या चर्चांना आता अंतिम स्वरूप येताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर थेट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची तारीख देखील जाहीर करून करून टाकली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रि‍करणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावरण असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमधील काही नेते मात्र या एकत्रि‍करणाला अनुकूल नसल्याचे पाहायला मिळत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे सुरुवातीपासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाला विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला एकत्रि‍करणाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा देत असं झाल्यास आपण राजकारणातून काही काळ संन्यास घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असताना प्रशांत जगताप यांनी थेट आपला राजीनामाच पक्षाकडे दिल्याचं सांगितलं जात आहे.

Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
Yatin Kadam : निफाडमध्ये यतीन कदम नावाच्या नव्या नेतृत्वाचा उदय, आजी-माजी आमदार अस्वस्थ

दरम्यानच्या काळामध्ये गेले दोन दिवस प्रशांत जगताप हे मुंबईला जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी याबाबत चर्चा करताना देखील दिसून येत आहेत. सलग दोन दिवसाच्या चर्चेनंतर आज प्रशांत जगताप आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये संताप व्यक्त होत असताना दिसत आहेत.

Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
Walmik Karad : 'मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही...'; दोष मुक्तीसाठी वाल्मीक कराडचा खंडपीठात अर्ज

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांना चांगलचं सुनावलं आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, "अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोअर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय.

"मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार,अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा, अशा शब्दात मिटकरी यांनी जगताप यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com