Mumbai News : मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे निघाली होती.ही बोट (Mumbai Boat Accident) गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली.या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एलिफंटाला जाणारी बोट अरबी समुद्रात उलटून तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच बेपत्ता नागरिकांची माहिती उद्या पर्यंत मिळेल असे देखील त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत देखील फडणवीस यांनी जाहीर केली आहे.या बोटीत एकूण 110 प्रवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.
नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात उलटली.या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते.बोटीची क्षमता 80 असताना त्यातून 110 जण प्रवास करत होते.दरम्यान या प्रकरणी 13 जणांचा मृत्यू आहे.त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बोट दुर्घटनेत आत्तापर्यंत 101 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.बुधवारी संध्याकाळी 7.30 पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.या अपघाताची नौदल आणि मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.तसेच बेपत्ता नागरिकांची माहिती उद्या पर्यंत मिळेल असे देखील त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.