सरपंच संतोष देशमुख याची नियोजन पद्धतीने हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज विधानसभेत केला आहेसंतोष देशमुखला महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता, असे भाजपाचे सदस्य सुरेश धस यांनी विधानभेत सांगितले.
एलिफंटला जाणारी बोट अरबी समुद्रात उलटून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच बेपत्ता नागरिकांची माहिती उद्या पर्यंत मिळेल असे देखील त्यांनी सांगितले. मृत्यांचा कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत देखील फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, शरद पवार आहेत ते.. सुप्रिया सुळे कुठे बोलताना दिसतात? त्यांचे कोणते तरी प्रवक्ते बोलताना दिसतात. याचा अर्थ समजून घ्या, जेव्हा पवार शांत असतात याचा अर्थ वादळ निर्णय होतंय, असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. हिवाळी अधिवेशनात किंवा अधिवेशनानंतर शरद पवार काय निर्णय घेतील हे तेव्हाच कळेल’ असंही त्यांनी म्हटलं.
मुंबईकडून एलिफंटला जाणारी बोट अरबी समुद्रात उलटली आहे. बोटमधील 77 प्रवासांची सुटका करण्यात आली आहे. तर, तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. बचाव दलांकडून रेस्कू ऑपरेशन सुरू आहे.
मुंबईकडून एलिफंटला जाणारी बोट अरबी समुद्रात उलटली आहे. बोटमध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये तरुण-तरुणी, ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. समुद्राच्या पाण्यात पडलेल्यांच्या बचावासाठी युद्धपाळीवर प्रयत्न सुरू आहेत. UNESCO जागतिक वारसा स्थळात एलिफंटा लेणीचा समावेश आहे. मुंबई शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर एलिफंटा (घारापुरी) बेटावर लेणी आहेत. इथं जाण्यासाठी बोटीनं अरबी समुद्रातून प्रवास करावा लागतो.
नागूपर अधिवेशनात शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. हेच अगोदर केलं असतं, तर शिवसेनेचे दोन भाग झाले नसते. देवेंद्र फडणवीस यांचे फोन देखील उद्धव ठाकरे यांनी पूर्वी स्वीकारले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोणतीही मागणी नव्हती. एकनाथ शिंदेंची एकमेव मागणी होती की आपण हिंदुत्वाचा विचाराबरोबर जाऊ, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
सोलापुरात भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात भीमसैनिक आक्रमक झाले. अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. भीमसैनिकांनी अमित शाह यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा भाजपच्या आमदार-खासदारांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा देखील भीमसैनिकांनी दिला.
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सदावर्ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुणरत्न सदावर्ते करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तुळजाभवानीचे दर्शन व एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीसाठी सदावर्ते आले आहे. त्यावेळी ते तुळजापुरात भवानी मातेच्या दर्शनासाठी चालले होते.
"मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. एवढच नाही. राज्या-राज्यात जाणार आहे. ओबीसींचा एल्गार करणार आहे. ही लढाई अस्मितेची आहे. एका मंत्रिपदाची लढाई नाही. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ही लढाई आमच्यावर कुरघोडी करणाऱ्यांविरोधात आहे", असे ओबीसी तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले.
भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विधान म्हणजे, जुनी मानसिकता आहे. भाजपची जुनी मानसिकता बाहेर पडली. भाजपची जळफळाट होत राहणार आहे. यात काहीच नाविन्य नाही. त्यावेळचे प्लॅन होते, त्यांना अंमलात आणता आले नाही. त्यावरचा भाजपचा हा जळफळाट आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार 21 डिसेंबरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली आहे. हा मुद्दा विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनात तापलेला आहे. यातच शरद पवार हे मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंब यावेळी पवारांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिले. दिल्लीत यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. पंतप्रधान मोदींना साहित्य संमेलनाचं प्रमुख पाहुणे म्हणून देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.
भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान केल्याचा आरोपावरून गोंधळ झाला. लोकसभा, राज्यसभा आणि विधानपरिषदेत चांगलाच गोंधळ झाला. अमित शाह यांनी आंबेडकरांची, देशाची माफी मागावी, अशी मागणी करताना शाह यांच्या या भूमिकेवर भाजपने उत्तर द्यावे, अशी मागणी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी केली. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर आम्हाला देवाअगोदर आहेत. ते आमच्या मना-मनात आहेत. श्वासात आहेत, असं भाजपला सुनावलं. शिवसेनायुबीटी पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी अमित शाह यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आल्याचा टोला लगावला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शाह यांच्या या विधानाचा निषेध केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा नोंद असून यापूर्वी तिघांना अटक झाली आहे. देशमुख हत्येप्रकरणात चाटे मास्टरमाईंट असल्याचा संशय आहे. तसेच पवनचक्की अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली देखील विष्णू चाटेवर गुन्हा दाखल आहे. बीड परिसरातून चाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली. अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल 12 तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता.
छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कधी जाणार, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी योग्य वेळ आल्यावर त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत. भुजबळांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. भुजबळांसोबत अनेक विषयांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तसेच समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्याशी यावर लवकरच सविस्तर चर्चा करणार आहोत, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच खातेवाटपाला विलंबावर कोणतेही मतभेद नाहीत, अशीही प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
छगन भुजबळ यांच्या भेटीला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर आले आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. दोन दिवसांपासून नागपूर अधिवेशन अर्धवट सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. तिथं त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे. यातच राजा राजापूरकर भुजबळांच्या भेटीला आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी आलो आहे, एवढीच प्रतिक्रिया राजा राजापूरकर यांनी दिली. यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राजा राजापूरकर यांनी भेटीचं 'योग्य टायमिंग' साधल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे पक्ष भविष्यात राहतील की नाही, ही शंकाच आहे. सध्याचे राजकारण पाहता शिंदे, पवारांच्या पक्षांना संघाने बैद्धिकसाठी बोलावलं आहे. त्यांच्या पक्षात मंत्रिपदासाठी रडारड सुरू आहे. भाजपने केंद्रीय यंत्रणा वापरून राजकारण केले आहे. हेच त्यांच्या अंगलट येत आहे. आता मनधरणीत, रडारडीत वेळ चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट फक्त शुभेच्छा देण्यासाठी होती, त्यात खळबळसारखं काय आहे? असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधानपरिषद सभापतीपदासाठी कर्जत-जामखेडमधील भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, राम शिंदे यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर या पदासाठी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळत असल्याची प्रतिक्रिया देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.