Shinde-Fadnavis government
Shinde-Fadnavis government Sarkarnama
मुंबई

Cabinet Meeting : विठ्ठलाच्या महापुजेपूर्वी मुख्यमंत्री घेणार मोठे निर्णय ; जाहिरात वादानंतर दोन आठवड्यांनी मंत्रीमंडळाची..

सरकरानामा ब्युरो

Maharashtra Politics : राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र,एका जाहिरातीवरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली. जाहिरात वादाच्या दोन आठवड्यांनी आज (बुधवारी) मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. आजच्या बैठकीतील निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या १८ जून रोजी प्रकाशित झालेल्या एका जाहिरातीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीत काही काळ तणाव होता. या वादानंतर मंत्रीमंडळाची बैठक झाली नाही. त्यानंतर दोन आठवड्यानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीत तब्बत ४० निर्णय होण्याची शक्यता आहे.

आषाढीवारीच्या निमित्ताने विठुरायाच्या पुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता ही बैठक होण्याची माहिती आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल (मंगळवारी) याबाबतचा अजेंडा मंत्रीमंडळाकडे येत असतो.

या अजेंडानुसार आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ४० निर्णय होण्याची माहिती समोर आली आहे. एवढे निर्णय एका मंत्रीमंडळ बैठकी गेल्या पंधरा वर्षात झालेले नाही. त्यामुळे हे कोणते ४० निर्णय शिंदे-फडणवीस सरकार घेणार , याकडे राजकीय वर्तुळासह सगळ्याचे लक्ष याकडे लागले आहे. आजच्या बैठकीच्या प्रस्तावासंदर्भाबाबतचे कागदपत्र जमविण्यात मंगळवारी सांयकाळी मंत्र्यालयाच्या अनेक विभागात कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु होती.

आळंदी व देहूतून विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूकडे मार्गस्थ झालेली पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 29 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरात विविध राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे स्वागताचे फलक व बॅनर्स लावलेत. या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT