Aaditya Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Mumbai News : कोस्टल रोडवर 'टोल'चा ब्रेक? आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

Toll on Coastal Road : सी-लिंकवर टोल आकारले जात असताना कोस्टल रोड टोलमुक्त राहण्याची शक्यता किती?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणार कोस्टल रोडचा एक टप्पा लवकर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. वरळी ते मरिन ड्राईव्ह ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार असून त्यावर टोल आकारण्याची शक्यता आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडवरील वरळी ते मरिन ड्राईव्ह मार्गिका खुली करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या मार्गिकेसाठी टोल आकारले जाईल, अशी शक्यता मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या बातमीने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राचा हवाल देत महायुती सरकारवर टीका केली आहे. आमची सत्ता असताना या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली होती. शिवाय कोस्टल रोड टोल-फ्री आणि सिग्नल-फ्री करण्याची आमची योजना होती. तरीही कोस्टल रोडवर टोल आकारून हे सरकार लुटण्याचे काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं वरळी ते मरिन ड्राईव्ह मार्गाचे काम 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. तर कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिकांचे लोकार्पण होण्यासाठी मे महिना उजाडेल, अशी माहिती महापालिकेने दिल्याचे या वृत्तपत्राने नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोस्टल रोडचा 14 हजार कोटींचा प्रकल्प असून 16 डिसेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी कोस्टल रोड टोल-फ्री असेल, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. पण आता टोलची चर्चा सुरू झाल्याने मुंबई महापालिकेचे नक्की धोरण काय आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

टोल आकारण्याची शक्यता

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक हा मार्ग टोल-फ्री नाही. या प्रकल्पासाठी 1800 कोटी खर्च केला होता. शिवाय आताच्या कोस्टल रोडचा वरळी सी-लिंक एक टप्पा आहे. त्यामुळे कोस्टल रोड टोल-फ्री राहण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते. मरिन ड्राईव्ह ते वरळी पुढे वरळी-वांद्रे सी-लिंक त्यानंतर वांद्रे ते वर्सोवा-बोरीवली असा हा कोस्टल रोड आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT