Eknath Shinde News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दोन प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

CM Eknath Shinde On Coastal Road Project Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील प्रकल्पांबाबत केली मोठी घोषणा...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. कोस्टल रोडबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीत मरीन ड्राईव्ह ते वरळीदरम्यान कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यावर मुंबईकरांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Eknath Shinde
Maharashtra Government : महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरकारचा मोठा निर्णय; अनंत चतुर्दशी, दहिहंडीनंतर आता...

महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त प्रोजेक्ट आहेत. पूर्वीच्या काळात सगळे बंद करण्यात आले होते. आमचे सरकार आल्यावर सगळे प्रकल्प सुरू झाले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा पहिला टप्पा जानेवारी अखेपर्यंत सुरू होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. त्यानंतर पुढील टप्प्याचे काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील आणखी एका प्रोजेक्टबाबत मोठी माहिती दिली. शिवडी ते न्हावा हा 22 किमीचा MTHL रस्ताही पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीत सुरू होणार आहे. यामुळे आता लागणाऱ्या 2 तासांऐवजी फक्त 15 मिनिटे लागणार आहेत. यामुळे मुंबईकरांचा मोठा वेळ वाचणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले.

Eknath Shinde
Radheshyam Mopalwar: वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या मोपलवारांना निवृत्तीनंतरही का मिळाली होती सात वेळा मुदतवाढ ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com