Kirit Somaiya  Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'वर; मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू

Kirit Somaiya News: किरीट सोमय्यां यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादात सापडले आहेत. किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे मंगळवारी विधिमंडळात देखील पडसाद उमटले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यानंतर आता पोलीस अॅक्शन मोडवर आले असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचा तपास सुरू केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १० चे पथक चौकशी करणार आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर पथकाची देखील मदत घेणार आहेत.

हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित कथित व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी पाठवलेल्या पत्रात "मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून चौकशी करावी", असं म्हटलं होतं.

दरम्यान, सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओनंतर राज्यभरातून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाने केल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT