Sushma Andhare On Somaiya Viral Video: आता सुट्टीच नाही ! सोमय्यांचा 'व्हिडिओ' भाजपनेच बाहेर काढला; अंधारेंचा खळबळजनक दावा

Sushma Andhare on Kirit Somaiya Viral Video : सुषमा अंधारे यांचा किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल
Sushma Andhare and Kirit Somaiya
Sushma Andhare and Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादात सापडलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट ) सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आणि किरीट सोमय्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपनेच व्हायरल केल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. त्यामुळे हा व्हिडिओ कुठून आला, कोणी व्हायरल केला, याकडे संशयाने पाहिले जात आहे. या मुद्यांवरून अंधारे या सोमय्यांना चहूबाजूंनी अडकविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात गोंधळ सुरू झाला आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओवरून त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. त्यात सुषमा अंधारे यांनीही सोमय्यांवर जोरदार शब्दात टीका करीत नवा दावा केला आहे. या घटनेबाबत अंधारेंनी फेसबुक पोस्ट करून सोमय्यांना सुनावले आहे.

"किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. मात्र, या प्रकरणात काय करणार असा सवाल, अंधारेंनी उपस्थित केला आहे.

Sushma Andhare and Kirit Somaiya
Kirit Somaiya viral video : सोमय्या यांच्या अडचणीत वाढ; दानवेंचा पेन ड्राईव्ह आणि फडणवीसांची घोषणा...

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

"किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. किरीट सोमय्या धुतल्या तांदळाचे नाहीच आहेत. किंवा त्याचे समर्थन करण्याचा तर प्रश्न अजिबातच उद्भवत नाही. मागे एकनाथ खडसे यांनी, "माझ्यावर ED लावणाऱ्यांच्या सीडी माझ्याकडे आहेत", असे म्हटले होते. हा संदर्भ सुद्धा तितकाच महत्त्वाचा. पण मुद्दा वेगळाच आहे. भाजपने मोठ्यात मोठी प्रकरणं लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा?", असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Sushma Andhare and Kirit Somaiya
Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओतील ‘ती’ महिला कोण ?

"महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदी विक्री, पक्ष फोडाफोडी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय. भाजपने सोमय्या यांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती बेछूट आरोप केले ते सगळेच लोक आता भाजपच्या वळचणीला आहेत. या सगळ्या लोकांना जर शुद्ध चारित्र्याचे आणि खरे ठरवायचे असेल तर त्यांच्यावर आरोप करणाऱ्या सोमय्या यांना उघडे पाडलेच पाहिजे, ही भाजपाची गरज आहे", असंही त्यांनी म्हटलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com