Mumbai News: महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षांमध्ये एकमेकांसमोर आव्हान उभं करण्यासाठी सरसावले आहेत. नेत्यांची फोडाफोडी,आरोप-प्रत्यारोप यांच्यासह मिळेल ती संधी स्विकारुन महायुतीतील घटक पक्षांमध्ये राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसह भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हे दिसून आलं. यानंतर आता भाजप-शिवसेनेचा पुढच्या निवडणुकीसाठीचा रणनीती ठरल्याचं समोर येत आहे.
मुंबई महापालिकेनंतर आता महाराष्ट्राची राजधानी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ही निवडणूक निश्चितच भाजप शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीबाबत बिघडलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून सर्वात मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
भाजप आणि शिवसेना या महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये शुक्रवारी(ता.20)मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी मुंबई जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून सहकार पॅनलमध्ये लढणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
सध्या मुंबई जिल्हा बँक निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आहे. भाजपचे मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात एकूण 20 सदस्य आहेत. त्यात भाजप आमदार प्रसाद लाड, मुंबई महापालिकेतील नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांसारख्या नेत्यांचा बँकेच्या संचालक मंडळात समावेश आहे.
मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजप तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. मात्र,जागावाटपाचा मु्द्दा समन्वयानं सोडवण्यासह या निवडणुकीला महायुती म्हणून एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचं समोर आलं होतं. याबाबत शिंदेंकडून चाचपणीही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे याबाबत पाडव्याच्या मुहूर्तावर एक महत्वाची बैठकही पार पडली होती.
एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्याची शक्यता होती. मात्र, याचदरम्यान, भाजपनं या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबाबत पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.