

Thane News: उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र,याच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन वर्षे पूर्ण होत आले आहे. तरीही स्थायी समिती,परिवहन समिती,शिक्षण समिती यांसारख्या एकूण पाच प्रमुख समित्यांच्या सभापती आणि सदस्यांच्या निवडणुका अद्याप पार पडल्याचं समोर आलं होतं. यावरुन उच्च न्यायालयानं शिंदेंना आठ आठवड्यांची मुदत दिली होती. अखेर शिंदेंनी न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 10 महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावे शुक्रवारी (ता.20 नोव्हेंबर) जाहीर केली आहे. या नियुक्त्यांमध्ये शिंदेंनी धक्कातंत्र वापरलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्थायी समितीच्या समित्यांमध्ये विक्रांत तांडेल, बाबाजी पाटील,दिलीप बारटक्के, संध्या मोरे, राजेश मोरे, पवन कदम, प्रमिला केणी, आदेश भगत, महेश साळवी यांना स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये योगेश जानकर, राम रेपाळे, विमल भोईर, सुधीर कोकाटे,विकास रेपाळे,रमाकांत मढवी यांना धक्का दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं एकनाथ शिंदे यांना गेल्या महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या पाच प्रमुख पालिका समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता शिंदेंनी स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती यांसारख्या एकूण पाच प्रमुख समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची नावे जाहीर केली आहे. मात्र,यावेळी त्यांनी या नियुक्त्यांसाठी देव पाण्यात ठेवलेल्या शिवसेनेच्या बहुचर्चित तसेच दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला आहे.
तर याचदरम्यान, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णकर यांच्या हत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनाही स्थायी समितीसाठी डावललं असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थायी समितींच्या सदस्यांची नियुक्त्या करताना इच्छुकांना दणका दिला आहे. यावेळी शिंदेंकडून स्थायी समितीवर अनुभवी आणि नवीन चेह वर्णी लागण्याची शक्यता होती. संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर एक अनुभवी आणि दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती.पण ती फोल ठरली.
ठाणे महानगरपालिकेत सध्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत शिवसेनेचे सर्वाधिक 9, भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) आणि एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य असणार आहे.
तर यापूर्वी ठाणे महानगरपालिकेतील या दोन्ही प्रकरणी अॅड. सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या महानगरपालिकेतील पाच प्रमुख पालिका समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका रखडल्याप्रकरणी याचिका दाखल कऱणारी विचारणा केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 8 आठवड्यांच्या आतच सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश दिले होते.त्यानुसार आता एकनाथ शिंदेंनी या नियुक्त्या प्राधान्यानं केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.