Mumbai crime news : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा नावाचा वापरून सराफ व्यावसायिकांकडून खंडणी मागण्याचं सुरू असलेल्या सत्राला, मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. दोन आठवड्यांत मुंबईतील तीन सराफा व्यावसायिकांना ब्रिटन देशाचं सीम कार्ड वापरून धमक्या देण्यात आल्या होत्या.
यातील एका प्रकरणात मुंबई अन् झारखंडवरून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी कोणताही संपर्क नसल्याचे मुंबई (Mumbai) पोलिसांकडून सांगण्यात आलं.
बिश्नोई किंवा त्याच्या टोळीचा वापर करत आरोपींनी सराफ व्यावसायिकांना धमकावले. या धमक्या देण्यासाठी परदेशी सीम कार्डचा वापर करण्यात आला. विलेपार्ले इथल्या सराफ व्यावसायिकाला 12 फेब्रुवारीपासून +44 या ब्रिटनचा संकेतांक (कंट्री कोड) असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 20 लाखांच्या खंडणीसाठी (Crime) धमकीचे मेसेज आणि कॉल केले गेले.
सराफ व्यावसायिकांना धमकावण्यासाठी बिश्नोई गँगकडून बोलत असल्याचे आरोपी भासवत होते. पुढे खंडणीची रक्कम पाच लाख ठरली. लोकमान्य टिळक टर्मिनस इथं ती स्वीकारण्यासाठी आलेल्या चौघांना तर झारखंडच्या धनबाद शहरातून एकाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली.
तर 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान बोरिवली इथल्या सराफा व्यावसायिकाला 30 लाखांच्या खंडणीसाठी बिश्नोई गँगच्या नावाचा वापरून +44 संकेतांक आलेल्या मोबाईल क्रमांकावरून धमकावण्यात आले. ‘खंडणी नाही दिली, तर तुझाही बाबा सिद्दीकी करू,’ अशी धमकी देण्यात आली. मात्र संबंधित व्यापाऱ्याने न डगमगता बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, अशाच स्वरूपाचा गुन्हा अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यातही दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
धमकीच्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच सीम कार्डच्या आधारे व्यापाऱ्यांना धमकावण्यात आले. माहितीच्या आधारे विलेपार्ले पोलिसांनी झारखंडमधील धनबाद इथं कारवाई केली, तेव्हा प्रमुख आरोपी निसटला. मात्र त्याचा साथीदार पोलिस पथकाच्या हाती लागला. अन्य विलेपार्लेसह बोरिवली आणि डी. एन. नगर पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.
खंडणीच्या गुन्ह्यांमागे झारखंडमधील जामतारा गावातील एखादी संघटित सायबर गुन्हेगारी टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. गुगलआधारे मुंबईतील व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक शोधून त्यांना बिश्नोई टोळीच्या नावे धमकावून पैसे उकळण्याची ही नवी पद्धत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.