Gujarat Lions : ठाकरेंच्या पेंग्विनसमोर गुजरातचा सिंह दहाडणार; महापौर तावडेंचा मुंबईत काय आहे प्लॅन?

Mumbai Mayor Ritu Tawde to Write to Gujarat CM for Lions : मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात गुजरातच्या सिंहांची एन्ट्री होणार आहे.
Mumbai Mayor Ritu Tawde
Mumbai Mayor Ritu TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Zoo Latest News : मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहांची गर्जना कानी पडणार आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून सिंह देण्याची मागणी करणार आहेत, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

मुंबई (Mumbai) भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण आहे. पालिकेच्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात 15 पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारच्या 13 जातींचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत.

याशिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्ष-वनस्पती आहेत. तसेच रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचे ही राणी बाग आकर्षणाचे केंद्र आहे. आता राणी बागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातच्या (Gujarat) सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे.

Mumbai Mayor Ritu Tawde
Jayakwadi Dam Land Acquisition Case : सहा कोटी जमा करा! अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; शेतकऱ्यांचा मोबदला थकवल्याने न्यायालयाचा दणका

मुंबईच्या महापौर रितू तावडे लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहेत. गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे एक किंवा दोन सिंह मुंबईला देण्याची विनंती या पत्रातून केली जाणार आहे.

Mumbai Mayor Ritu Tawde
Abhishek Kalamkar: राजकारणात खळबळ! अभिषेक कळमकरांवर आणखी एक गंभीर आरोप; पोलिसांची मोठी कारवाई

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत सिंहांसाठी आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून राणीच्या बागेत मोठा नवीन प्राणी दाखल झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेने जुलै 2017 मध्ये दक्षिण कोरियाच्या एका एक्वरियममधून आठ पेंग्विन जिजामाता उद्यानात आणले. मुंबईतलं दमट हवामान पेंग्विनला अनुकूल नसल्याने त्यांच्यासाठी कृत्रिम कक्ष उभारावा लागला. त्यासाठी महापालिकेचा कोट्यवधी खर्च झाला.

पेग्विंन सांभाळण्याचा चर्चा

पेग्विंन सांभाळण्यासाठी एक जानेवारी 2020 ते 31 मे 2025 या कालावधीत 25 कोटी 83 लाख 45 हजार 733 रुपये झाला आहे. दरवर्षी होणारा खर्च 5 कोटी 16 लाख 69 हजार रुपये एवढा आहे. दर महिन्याचा 43 लाख रुपयांहून अधिक खर्च होतो.

गुजरातचे सिंह कधी येणार

आता गुजरात सिंह आणण्याच्या हालचाली भाजप महापौर रितू तावडे यांनी सुरू केल्या आहेत. यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना त्या पत्र लिहिणार आहे. दोन सिंह आणण्याचा प्रस्ताव आहे. आता या सिंह आणण्याचा आणि त्यांच्या पालनपोषणाचा खर्च किती होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com