Mumbai News : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी महायुती व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु होती. एकीकडे भाजपने घाटकोपरमधील भाजपच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे तर उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संजय घाडी यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची उमेदवारी कॊणाला दिली जाणार याची उत्सुकता होती. मात्र, शनिवारी मातोश्रीवर सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आकड्याचे गणित मान्य असल्याचे सांगत मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
शनिवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेतील सर्व पक्षाचे बलाबल पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रसार माध्यमाशी बोलताना ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली.
2017 साली झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने (BJP) त्यावेळी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपचा पैरा फेडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निर्णयानंतर आता मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंचा बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळीच भाजपने महापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा करीत आघाडी घेतली होती. या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर पदाच्या नावाची घोषणा केली. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करताना भाजपने मोठे प्लॅनिंग केल्याचे दिसत होते तर दुसरीकडे उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संजय घाडी यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपकडे काठावरील बहुमत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महापौरपदाचा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस निर्माण करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी मुंबई महापालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत सर्व नेतेमंडळींची चर्चा पार पडली. मुंबई महापालिकेतील सर्व पक्षाचे बलाबल पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने मराठा उमेदवार दिला आहे. त्यामुळे कोणताच अपशकुन न करता विरोधी पक्षाची भूमिका येत्या काळात सक्षमपणे मांडणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत रितू तावडे यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचेच येत्या काळात होत असलेल्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.