Shiv Sena UBT : गरम तेलामुळे उद्धव ठाकरेंचा उमेदवार गंभीर जखमी; मतदानाला काही तास शिल्लक असताना घडला धक्कादायक प्रकार

Maharashtra local body elections News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 225 पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 225 पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. त्यातच धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गटातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीवेळी उमेदवाराच्या अंगावर गरम तेल पडले. या घटनेत अंगावर गरम तेल पडल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. प्रचारादरम्यान ही घटना घडताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर धाराशिव येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा थंडावल्या आहेत. त्यातच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळंब तालुक्यातील देवळाली गावात प्रचाराच्या सांगता रॅलीचे गुरुवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी खामसवाडी गटातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसनेच्या उमेदवार मनीषा वाघमारे यांच्या अंगावर गरम तेल पडले. या घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Uddhav-Thackeray
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनीषा वाघमारे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गुरुवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कळंब तालुक्यातील देवळाली गावात त्यांच्या प्रचाराच्या सांगता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी कार्यकर्त्याची हातात धगधगती 'मशाल' घेऊन रॅली सुरू होती.

Uddhav-Thackeray
Eknath Shinde VS BJP : भाजपची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना सत्तेत वाट नाही? महापौर, उपमहापौर पद सोडण्यास नकार!

या काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान अचानक उमेदवार असलेल्या मनीषा वाघमारे यांचा पाय अडकला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या खाली जमिनीवर पडल्या. याच वेळी त्यांच्या हातातील पेटत्या मशालीतील गरम तेल त्यांच्या अंगावर सांडले. गरम तेल अंगावर उडाल्याने त्यांचे हात आणि पाय गंभीररित्या भाजले आहेत.

Uddhav-Thackeray
Shivsena UBT : 'मोदींवर ट्रम्प यांचा प्रचंड दबाव, सर्व अटी-शर्ती मान्य; अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी भारताला गुलाम बनवले...'; ठाकरेंचा हल्लाबोल

या घडलेल्या घटनेनंतर रॅलीत एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी तातडीने मनीषा वाघमारे यांना धाराशिव येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्या गंभीररीत्या भाजल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Uddhav-Thackeray
NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com