Atul Save Sarkarnama
मुंबई

Mumbai News : मुंबईतील म्हाडा वसाहतींसाठी खुशखबर; मंत्री अतुल सावे यांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Winter Session : मुंबईतील म्हाडा वसाहतींसाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मुंबईतील 56 म्हाडा वसाहतींचे सेवा शुल्क माफ केल्याची घोषणा आज नागपुरात केली. ही रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 384 कोटींची आहे.

मुंबईतील म्हाडा वसाहतींचे सेवा शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील सर्व आमदारांनी केली होती. त्यावर राज्य सरकारने सरकारात्मक निर्णय घेत सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली.

सेवा शुल्क वाढवल्यामुळे ते 50 टक्के झाले होते. हा म्हाडा रहिवाशांसाठी मोठा आर्थिक बोजा होता. त्यामुळे हे शुल्क कमी करण्याची मागणी म्हाडाच्या वसाहतींमधील रहिवाशांची होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

(Edited by - Avinash Chandane)

मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. यात लाखो मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्य करत आहेत. सरकारच्या सेवा शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे या लाखो मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT