Devendra Fadnavis statement Mira Road attack: मुंबईजवळील मीरा रोडवरील जैब जुबैर अन्सारी याने सुरक्षा रक्षकांवर केलेल्या 'lone wolf attack'च्या तपासात 'ATS'ने मोठा लिड घेतला असून, हल्ल्यापूर्वी त्याला मोठी रक्कम मिळाल्याचे तपसात समोर आलं आहे. जैब जुबैर अन्सारी हा ऑनलाईन शिक्षक होता. तो अबुधाबी तसंच आखाती देशातील मुलांना ॲानलाईन शिकवायचा.
'ATS'ने त्याचा लॅपटाॅप अन् पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. 'ATS' वेगाने तपासाची चक्रे फिरवत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'जैब जुबैर अन्सारी याचा हा प्रकार म्हणजे, सेल्फ रॅडिकलायझेशनचे प्रकरण आहे,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जैब जुबैर अन्सारी याचा 'ATS'ने ताबा घेतल्यानंतर, मोठी माहिती समोर येऊ लागली आहे. लॅपटाॅप, पेन-ड्राईव्ह जप्त केला असून, हल्ल्यापूर्वी त्याच्याकडे मोठी रक्कम आढळली आहे. ही रक्कम कशा करता मिळाली आहे, याची तपासणी 'ATS' करत आहेत.
जैब जुबैर अन्सारी हा ऑनलाईन शिक्षक होता. अबू धाबी, आखाती देशातील मुलांना तो ॲानलाईन शिकवायचा. तसेच त्याचे परदेशी दौरे देखील झाले आहेत. जैब अन्सारी याच्या सर्व संपर्काची'ATS' चौकशी करत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची, या हल्ल्याबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "हे सर्व प्रकरण म्हणजे, सेल्फ रॅडिकलायझेशनचे असे दिसते. पुस्तके, साहित्य आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आरोपी स्वतःच कट्टरतेकडे वळला. जिहादच्या उद्देशाने आणि इतर धर्मियांची हत्या करण्याच्या हेतूने त्याने हा गुन्हा केला आहे."
'आरोपीला अटक करण्यात आली असून, एटीएस आणि एनआयएच्या मदतीने या रॅडिकलायझेशनमागे आणखी कोण आहे, याचा शोध घेतला जाईल. आरोपीचे कुटुंब सध्या अमेरिकेत असून आरोपी स्वतःही भारताबाहेर राहिलेला होता', असे तपासात समोर आल्याचे ख्यमत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारतात आल्यानंतर तो प्रथम कुर्ला येथे राहिला. त्यानंतर नया नगर इथं आला. यामागे कोण आहे? त्याचे कोणाशी संबंध आहेत? अशा प्रकारे आणखी कोण कट्टरतेकडे वळले आहेत का? या सर्व गोष्टी तपासाच्या सूचना केल्या आहेत,'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.