Mumbai BMC Sarkarnama
मुंबई

BJP demand Mumbai fire brigade : अजब कारभार; 68 मीटर उंचीच्या शिडीसाठी 40 कोटींची उधळपट्टी

Mumbai Fire Brigade Ladder Purchase Tender Investigation BJP Demands Inquiry by Additional Commissioner : मुंबई अग्निशमन दलात खरेदी होणाऱ्या शिडीमध्ये कोटी रुपयांची होत असलेल्या उधळपट्टीची चौकशीची मागणी भाजपने केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Corporation fire brigade : मुंबई अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या 64 मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्याच्या वाढीव 68 मीटर शिडीसाठी अग्निशमन दलाने तब्बल 40 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे.

त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे (BJP) प्रवक्ते तथा माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली आहे.

मुंबई (Mumbai) अग्निशमन दलात 64 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर (शिडी) उपलब्ध आहे. त्याशिवाय आपत्कालीन काळात उंच इमारतीत पोहोचण्यासाठी 70 मीटर, 81 मीटर आणि 90 मीटर उंच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म बसवलेली वाहने उपलब्ध आहेत. तरीही अग्निशमन दलाने 68 मीटर उंचीच्या चार शिड्या खरेदी करण्यासाठी कंत्राट प्रक्रिया राबविली आहे.

68 मीटर उंचीची शिडी बनवणारी जगभरात ‘मॅग्रियस जीएमबीएच’ ही एकमेव कंपनी आहे. त्यामुळे याच कंपनीची जगभरात मक्तेदारी आहे. त्यामुळे शिडी खरेदीमध्ये स्पर्धाच झाली नाही. 68 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या टर्न टेबल लॅडरसाठी 2017-18 मध्ये तीन वेळा निविदा काढण्यात आली.

यात प्रत्येक वेळी मॅग्रियस जीएमबीएचसाठी एकच बोलीदार होता. म्हणून पालिकेने 64 मीटर शिडी बनवणाऱ्या कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली. या वेळी झालेल्या स्पर्धात्मक प्रक्रियेत 10 कोटी रुपयांत 64 मीटर शिडी खरेदी करण्यात आल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.

अग्निशमन दलाने थेट 68 मीटर उंच शिडीसाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत अन्य कोणत्याच कंपनीला भाग घेता आला नाही. त्यामुळे 68 मीटर शिडी बनवणाऱ्या कंपनीची मक्तेदारी वाढली. त्यामुळे या शिडीची किंमत थेट 20 कोटीपर्यंत गेली आहे.

अवघ्या चार मीटरने शिडीची उंची वाढत असताना महापालिका 64 मीटर शिडीपेक्षा दुप्पट पैसे मोजणार आहे. हे ‘सीव्हीसी’ निविदा धोरण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते. म्हणून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक शिरसाट यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT