NCP Sharadchandra Pawar Party : विधिमंडळाच्या लाॅबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना भिडणारे नितीन देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात मोठी संधी मिळाली आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलेल्या 16 जणांच्या पक्ष प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात नितीन देशमुख यांना देखील स्थान मिळालं आहे. नितीन देशमुख पक्षानं दिलेली मोठी जबाबदारी कशी संभाळतात, याकडे लक्ष लागलं आहे.
पावसाळी अधिवेशन काळात विधिमंडळाच्या लाॅबीत भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्या मारामारी झाली होती. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सर्जेराव बबन टकले (37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (41) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. या वादानंतर नितीन देशमुख चांगलेच चर्चेत आले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना थेट भिडणारा कार्यकर्ता म्हणून नितीन देशमुख यांची ओळख निर्माण झाली आहे. परंतु विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे या मारामारीचे प्रकरण गेले आहे. तिथं काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले असतानाच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देशमुख यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देत सन्मान केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रवक्तेपदाची यादी ट्विट केल्यानंतर, त्यात नितीन देशमुख यांना प्रवक्तेपदी नियुक्ती मिळाली आहे. या नियुक्तीवर नितीन देशमुख यांनी देखील ट्विट करत प्रतिसाद दिला आहे. 'आज माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक झाल्याची घोषणा आमचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाडसाहेबांनी केली आणि त्या यादीत माझं नाव आलं', अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिला आहे.
या नियुक्तीवर नितीन देशमुख यांनी, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एका सामान्य घरातील, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला एवढं मोठं पद मिळेल. पण बहुजनांचा विचार करणारा हा पक्ष, विचारांशी तडजोड न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असे म्हटलं आहे.
आजवर लोकांसाठी रस्त्यावर उतरलो, अन्यायाच्या विरोधात उभा राहिलो, आणि ज्या विचारधारेवर विश्वास आहे, त्यासाठी किंमतही मोजली. आता तिच निष्ठा आणि लढाऊ वृत्ती घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार आहे, असा निर्धार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ही केवळ नेमणूक नाही, हा माझ्यावरचा विश्वास आहे, आणि तो पूर्ण प्रामाणिकपणे निभावण्याचा संकल्प नितीन यांनी व्यक्त केला आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या प्रवक्त्यांची यादीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांचा देखील समावेश आहे. विद्याताई चव्हाण, अंकुश काकडे, सुधाकर भालेराव, भीमराव हत्तीअंबिरे, महेश तपासे, विकास लावंडे, सक्षणा सलगर, मेहबुब शेख, फहाद अहमद, राजा राजपुरकर, मनाली भिलारे, नितीन देशमुख, क्लाइड क्रास्टो, राखी जाधव, रचना वैद्य यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.