Poonam Mahajan Sarkarnama
मुंबई

Poonam Mahajan News: ...म्हणून दहा वर्षे खासदार राहिलेल्या पूनम महाजनांचा 'मुंबई उत्तर-मध्य'मधून पत्ता कट झाला!

Loksabha Election 2024 : भाजप नेत्या आणि मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून भाजपने अखेर आपला पत्ता उघडला आहे. या मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र वापरत अखेर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना शनिवारी (ता.27) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात थेट लढत होणार आहे. पण निकम यांना उमेदवारी जाहीर करत असतानाच भाजपकडून पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. (Mumbai North Central Lok Sabha Constituency)

भाजप नेत्या आणि मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. त्या 2014 पासून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि शनिवारी अखेर उज्ज्वल निकम Ujjawal Nikam यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे महाजन यांची खासदारकीच्या हॅटट्रिकची संधी हुकणार आहे. पक्षाकडून तिकीट कापले जाणे हा महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पूनम महाजन यांचा उमेदवारी न मिळण्यापाठीमागे अनेक कारणं असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या उमेदवारीला या मतदारसंघातूनच तीव्र विरोध सुरू होता. म्हणून विद्यमान खासदार महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं, त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं.

तसेच पूनम महाजन यांचा मतदारसंघातला घटलेला जनसंपर्क, विकासकामांबाबत निष्क्रीयता, पक्षाच्या बैठकांना दांडी, सोशल मीडियावर सक्रियता राखण्यात अपयश, दिल्लीतल्या नेत्यांशी संपर्क आणि त्यांच्या बदलत्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यात अपयश आल्याची चर्चा आहे. हीच कारणं भाजपकडून तिसऱ्यांदा तिकीट न मिळवण्यामागे असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक, उन्मेष पाटील यांच्यासह एकूण अकरा जणांचा पत्ता कट करत विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यात आता भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन Poonam Mahajan यांचा समावेश झाला आहे. महाजन यांच्यासारखा मोठा राजकीय वारसा असलेल्या महिला नेत्याचं तिकीट नाकारत पक्षातील नेत्यांना एकप्रकारे कडक इशाराच दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT