ravindra waikar sarkarnama
मुंबई

Ravindra Waikar Vs Amol Kirtikar Update : ज्याची भीती होती तेच घडलं...; वायकर अन् निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका

Mumbai North West Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला आहे.पण आता त्यांचा विजय अडचणीत सापडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्यासह अपक्ष उमेदवार भऱत शाह यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे.

यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडलीकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार भरत खिमजी शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी(ता.21)ॲड. असीम सरोदे, ॲड. विनय खातु,ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. किशोर वरक यांच्या मदतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेत 4 जून रोजी झालेली मतमोजणी व निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत भरत खिमजी शाह यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी,रविंद्र वायकर तसेच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यास आलेले आहे.

याचिकेत काय म्हटलंय ..?

निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे व मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले आहे. ४ जून २०२४ रोजी या मतदारसंघातील मतमोजणी नेस्को मतदान केंद्रावर झाली. सातत्याने विजयाचे दिशेने अग्रक्रमावर असलेले अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आल्या नंतर पोस्टल बैलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली आणि विविध घडामोडींचा शेवट अचानक रविंद्र वायकर (Ravindra Waikar) 48 मतांनी विजयी होण्यात झाला.

याचिकाकर्ते भरत शाह यांनी उच्च न्यायालयातील याचिकेतून निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर – महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी व मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर मुख्यतः आक्षेप घेतलेला आहे

निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का ?, अशाप्रकारे खासगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक होऊ शकते का ?, निवडणूक आयोगासोबत कार्यरत कोणतीही व्यक्ति मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का ? असे प्रश्न उपस्थित करून निवडणूक रिटरनिंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ २ फुटांच्या अंतरावर प्राजक्ता वायकर- महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही असे प्रश्न उपास्थित करण्यात आले आहेत.

पोलिसांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत पार पाडली नाही आणि मतमोजणी केंद्राबाहेर असलेल्या तात्पुरत्या कंट्रोल रूममध्ये 3 तास बसून ठेवल्यावर व नंतर वनराई पोलिस स्टेशनल नेऊन 2 तास बसून ठेवल्यावर या प्रकरणाची दखल पोलिसांतर्फे घेण्यात आली. परंतु,या संपूर्ण कालावधीत रविंद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पांडिलकर याच्या ताब्यातच संशयास्पद मोबईल फोन होता आणि तो सतत मोबाइलवर कार्यरत होता व फोनकॉल घेत होता अशी परिस्थिती भरत शाह यांनी याचिकेत नमूद केली आहे.

हा गंभीर आरोप

मतमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे वापरलेला हा मोबाईल फोन जप्त करताना कायदेशीर आवश्यकतेनुसार सील केला नाही व त्यावेळी त्याचा पंचनामा सुद्धा केला नाही आणि मुद्दामहून असा गलथानपणा केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केलेला आहे.

काय करण्यात आली मागणी ?

संबंधित विभागाकडून न्यायालयाने सर्व आवश्यक कागदपत्रे व रेकॉर्ड बोलवावे आणि मुंबई उत्तर पश्चिम येथील 4 जूनच्या निवडणूक निकालाला स्थगिती द्यावी अशी मुख्य मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT