Dharmarao Baba Atram : 'गडचिरोलीतून मी निवडून आलो असतो, पण ..' ; धर्मरावबाबा आत्राम यांनी केलं स्पष्ट!

NCP Minister Dharmarao Baba Atram : ...याकरिता आपणास पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते, असंही सांगितलं आहे.
Dharmarao Baba Atram
Dharmarao Baba AtramSarkarnama
Published on
Updated on

Dharmarao Baba Atram on Gadchiroli Loksabha Election :गडचिरोली लोकसभेसाठी आपण उमेदवारी मागितली होती. मी निवडून सुद्धा आलो असतो. पण आता हा विषय संपला आहे. मी नाराज नाही.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी गोंदियाचे पालकमंत्रिपद सोडल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.

महायुतीने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडाव्या. या पाचही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतो. याकरिता आपणास पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली विनंती मान्य केली आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा देण्याची मागणीही त्यांनी केली .

आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी गडचिरोली लोकसभेची उमेदवारी मागितली होती. महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेआधीच त्यांनी आपली उमेदवारी जाहीरसुद्धा केली होती. आपण कुठल्याही परिस्थितीत लढणारच असा दावाही त्यांनी केला होता.

मात्र भाजपचे (BJP) गडचिरोली सोडण्यास नकार दिल्या. त्यामुळे आत्राम यांचा नाईलाज झाला. भाजपचे उमेदवार अशोक नेते येथून पराभूत झाले आहेत. दरम्यान, त्यांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा विनंती केली होती.

Dharmarao Baba Atram
Dharmaraobaba Atram: धर्मरावबाबा आत्रामांना हवे फडणवीसांचे नेतृत्व; पालकमंत्रीपदात स्वारस्य नसल्याचे सांगत वाद टाळला?

यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. याबाबत विचारणा केली असता आत्राम यांनी लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याने आपण नाराज नसल्याचे सांगितले. गोंदियाच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सहा महिन्यांपूर्वीच केली होती. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात अधिक लक्ष द्यायचे आहे आणि विधानसभेच्या अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे.

Dharmarao Baba Atram
Bachchu Kadu : बच्चू कडू यांच्या जिवाला धोका; निनावी फोनवरून 'आज मौका देख के...'

तसेच गोंदियाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली आहे. यात नाराजीचा कुठलाच संबंध नाही. लोकसभेचा विषय आता संपला आहे. लोकसभेत महायुतीच्या बरेचसे उमेदवार पराभूत झाले असले तरी विधानसभेत त्याचा फारसा फरक पडणार नाही. विधानसभेचे जागावाटप लवकरात लवकर झाले, तर महायुतीच्या दोनशे जागा निवडून येऊ शकतात असाही दावा त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com