Akola Zilla Parishad BDO Kalidas Tapi : ...अखेर कालीदास तापी विरोधात गुन्हा दाखल; ग्रामसेविकेने केली होती विनयभंगाची तक्रार!

Akola Zilla Parishad Crime News : मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले आहे.
 Akola Zilla Parishad
Akola Zilla Parishad Sarkarnama
Published on
Updated on

Gramsevaka complains of molestation : अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास रघुनाथ तापी यांच्याविरुद्ध अखेर गुरुवारी, 20 जून रोजी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणात पूर्वीच अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी व सध्या कार्यरत असलेले लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी रा. कळमपुरी, जि. हिंगोली) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

याबाबत सविस्तर असे की, एका ग्रामसेविकेने उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी व अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ केला असल्याचा आरोप करीत दोन्ही अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याची तक्रार दिली होती.

 Akola Zilla Parishad
Akola Zilla Parishad News : ग्रामसेविकेची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह 'BDO'विरुद्ध विनयभंगाची तक्रार!

तक्रारीच्या अनुषंगाने 15 जून रोजी पहिल्यांदा लिंबाजी बारगिरे यांच्यावर रामदासपेठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तापी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे सदर ग्रामसेविकेने महिला आयोग, विरोधी पक्षनेता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली होती.

त्यामुळे पोलिसांवर प्रकरणाचा दबाव वाढला होता. अखेर रामदासपेठ पोलिसांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास रघुनाथ तापी यांच्यावर भादंवि कलम 354, 354 ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 Akola Zilla Parishad
Kripal Tumane : ... म्हणून कृपाल तुमाने आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत!

विशाखा समिती करणार चौकशी -

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे ग्रामसेवक महिलेने धाव घेत आपबिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषेदचे माजी पदाधिकारी राजीव बोचे उपस्थित होते. तर, घटनेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असून तापी यांच्यावर अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आपण चौकशी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेविकेने केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले असून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com