Deven Bharti
Deven Bharti sarkarnama
मुंबई

Deven Bharti : मुंबई पोलिसांमध्ये मतभेद आहेत का ?; देवेन भारतींचे टि्वट व्हायरल

सरकारनामा ब्युरो

Deven Bharti : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले सनदी अधिकारी देवेन भारती (Deven Bharti)यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारती यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर देवेन भारती यांनी केलेले टि्वट सध्या चर्चेत आहे. (Deven Bharti news update)

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात. आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर देवेन भारती यांची

मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. फडणवीस यांच्या खास मर्जीतले भारतीय पोलिस सेवेतील १९९४ च्या तुकडीचे अधिकारी देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. भारती यांच्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर नवे पद निर्माण करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.मुंबई पोलीस म्हणजे एक टीम आहे. या आशयाचं एक ट्विट देवेन भारती यांनी केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांमध्ये काही मतभेद नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हटलं जातं आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तेव्हा त्यांना साईड पोस्टिंग दिलं गेलं होतं. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकिय संचालक हे पद देवेन भारती यांना देण्यात आलं होतं.

काल (शुक्रवारी) देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचले. त्याआधी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली.भारती हे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फडणसाळकर यांच्यासोबत काम करणार आहेत. देवेन भारती यांच्या अखत्यारीत आर्थिक गुन्हे आणि इतर विभागांचा कार्यभार येऊ शकतो.

विशेष पोलिस आयुक्तपद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहील, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्त यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.

देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे.

विशेष पोलीस आयुक्तपद काय आहे. ?

  1. आतापर्यंत महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त पदासाठी नेमणूक केली जायची.

  2. महाविकास आघाडी सरकार जाताच नव्या सरकारने या पदाची निर्मिती केली आहे.

  3. आता सरकारने या नव्या पदाची निर्मिती केली असून त्याजागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  4. दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर मुंबईतही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.

  5. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम पाहणार आहेत.

  6. देवेन भारती यांच्याकडे गुन्हे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची जबाबदारी असणार आहे.

  7. भारती यांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाच अहवाल द्यावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT