Parbhani : एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीतील ३० नगरसेवक शिंदे गटात

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Parbhani News : राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यभरातून शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. स्थानिक स्वराज संस्था, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. काल (गुरुवारी) शिंदे गटात विविध पक्षातील ३० नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Eknath Shinde
Tanuja Bhoir : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून बड्या नेत्याची कन्या भाजपच्या वाटेवर ? ; 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार शिवाजीराव जाधव,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde
NCP NEWS : भाजपचा भगवा हा भोगाचा प्रतिक झालाय ; जनजागर सभेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे म्हणाले, "स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो,"

प्रलंबित प्रश्न सोडविणार

"राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com