Dadasaheb Phalke Chitranagari : उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी उद्योगपतीसोबत मुंबईतील बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्माते यांच्यासोबत संवाद साधला.
मुंबईतील चित्रनगरी (Mumbai Dadasaheb Phalke Chitranagari) उत्तरप्रदेशात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुन राजकारण रंगले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 1000 एकर जागेत फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे फिल्मसिटीचा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी ते मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात पळवू पाहत आहेत," असा आरोप त्यांच्यावर विरोधक करीत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करीत योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे.
“बॉलीवूड आणि मुंबई हे अतूट नातं आहे. चित्रपटसृष्टींची सुरवात ही स्वर्गीय दादासाहेब फाळकेंनी केली होती. चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही कि डब्यात घालून नेता येईल त्यामुळे चिंता नसावी”, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी ट्विट करत दादासाहेब फाळके चित्रनगरीवरून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. विधान परिषदेत सत्ताधारी आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यात वाद झाला होता. "मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी गुजरातला नेणार का," असा सवाल अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता.
योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टोला हाणला आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
"योगी आदित्यनाथ असो किंवा अन्य कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही," अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं आहे. "मुंबई मराठी माणसाची आहे," असे आव्हाड म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.