Ram Kadam
Ram Kadam  
मुंबई

राणे पिता-पुत्र, दरेकर यांच्यानंतर आता राम कदमांचा नंबर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणी केलेल्या विधानावरून ते अडचणीत आले आहेत. याचबरोबर विधान परिषदेतील पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात आघाडी उघडणारे भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार कदम हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करीत असतात. त्यांना होळीनिमित्त महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला होता. हाच निषेध त्यांना महागात पडला आहे. आमदार कदम या़च्यासह सात जणांवर पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी होळी निमित्त महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाचे पोस्टर पेटत्या होळीत टाकण्याचा प्रयत्न केला होता.

राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन

मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना नुकताच अटकपूर्व जामीन दिला आहे. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. हे दोघेही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. नंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

दरेकरांना सोमवारपर्यंत अटक नाही

भाजप नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अन्य खटल्यांमध्ये व्यग्र असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे. दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नये, असा आदेश सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT