अखेर मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपसमोर झुकले अन् विधानसभा अध्यक्ष जिंकले

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभा अध्यक्षांना झापल्याने राजकीय गदारोळ सुरू होता.
Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
Nitish Kumar and Vijay Kumar SinhaSarkarnama
Published on
Updated on

पाटणा : कोणत्याही विधानसभेत दिसणार असे चित्र बिहारच्या विधानसभेत दिसून आले होते. सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्येच जुंपली होती. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यात सभागृहातच जोरदार खडाजंगी झाली होती. अखेर नितीशकुमार यांनी भाजपसमोर झुकती भूमिका घेतली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यानुसार निर्णय घेतला असून ते बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे 14 मार्चला थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकले. सभागृहात सर्वांसमोर नितीश यांनी अध्यक्षांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली. विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा हे भाजपचे (BJP) आहेत. नितीश हे अध्यक्षांना झापत असताना भाजपचे मंत्री व आमदार मात्र, शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत बसून होते. यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपमधील दरी वाढल्याची समोर आले होते. यानंतर दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सभागृहाबाहेर जुंपली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी नमती भूमिका घेतली आहे.

Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
भाजपमध्ये नाराजीनाट्य; मुख्यमंत्रिपदाबाबत विचारताच राणे भडकले अन् दाखवलं नेतृत्वाकडं बोट

विधानसभा अध्यक्ष सिन्हा यांचा मतदारसंघ लखीसराय आहे. त्यांच्या मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांची हत्या झाली होती. या प्रकरणावरून सगळा राजकीय गदारोळ सुरू आहे. लखीसराच्या पोलीस अधीक्षकांची बदली करावी, या मागणीवर सिन्हा हे अडून बसले होते. अखेर नितीशकुमार हे भाजपच्या दबावासमोर झुकले आहेत. त्यांनी लखीसरायचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सय्यद इमरा मसूद हे नवीन पोलीस अधीक्षक आले आहेत. या सर्व प्रकरणामुळे सरकारमधील दोन पक्षांतीत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Nitish Kumar and Vijay Kumar Sinha
निलेश राणेंचं नाव घेताच जयंत पाटील म्हणाले, अशांवर मी बोलत नाही!

सभागृहात काय घडलं होतं?

लखीसराय प्रकरणावर सभागृहात मंत्री बिजेंद्र यादव उत्तर देत होते. या वेळी सभागृहाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नितीशकुमार संतापले. त्यांचा राग अनावर झालेला पाहून सभागृहातील सत्ताधारी व विरोधकही हैराण झाले होते. नितीशकुमार यांचा संताप पाहून अध्यक्षांसह भाजपचे आमदारही गप्पगार पडले होते. ते अध्यक्षांना उद्देशून म्हणाले होते की, तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज हाताळत आहात, ते मला पटलेले नाही. सभागृहात घटनेनुसार कामकाज अपेक्षित असते. परंपरांकडे काणाडोळा केला जाताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com