बंटी पाटील अर्धी लढाई जिंकले; कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसलाच मान

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याने बंटी पाटलांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. त्यांच्या उमेदवारीची काँग्रेसकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख यांच्या कानावर स्थानिक शिवसैनिकांच्या भावना घालू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधून शिवसेना लढण्याची चर्चा सुरु झाली होती.

शिवसैनिकांची भूमिका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला सामंत यांच्यासोबत राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते. तसेच, पालकमंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेने जयश्री जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेना आपला उमेदवार निवडणुकीत उतरवणार नसून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव याच असतील.

Satej Patil
अखेर मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपसमोर झुकले अन् विधानसभा अध्यक्ष जिंकले

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील होते. मात्र, भाजपकडून ही निवडणूक लढवण्यात येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. काँग्रेसकडून (Congress) दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. भाजपकडू (BJP) सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाईही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

Satej Patil
निलेश राणेंचं नाव घेताच जयंत पाटील म्हणाले, अशांवर मी बोलत नाही!

या मतदारसंघात सतेज पाटील यांचा मोठा प्रभाव असलेला बावडा व लाईन बाजारचा भाग आहे. यामुळे या भागात मताधिक्य कोण घेणार, यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल. सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी मिळाली असून, त्यांच्यावर महाडिक गटाचा शिक्का असल्याने सतेज पाटील या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावतील. भाजपने निष्ठावंतांना डावलून कदम यांना उमेदवारी दिल्याचे पडसाद भाजपमध्येच उमटत आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोधकांचा सामना त्यांना करावा लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com