Deven Bharti Sarkarnama
मुंबई

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठा बदल; देवेन भारती CP होताच फडणवीसांनी स्वतःचाच निर्णय गुंडाळला

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले 'विशेष पोलीस आयुक्त' हे पद रद्द करण्यात आले आहे.

Hrishikesh Nalagune

Mumbai Police : मुंबई पोलीस दलात दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले 'विशेष पोलीस आयुक्त' हे पद रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 'गुप्तवार्ता सहआयुक्त' या नव्या पदाची निर्मिती केली आहे. या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी IPS डॉ. आरती सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलात 'विशेष पोलीस आयुक्त' पदाची निर्मिती करण्यात आली होती. या पदावर मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त देवेन भारती यांची नियुक्ती केली होती. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले होते.

देवेन भारती हे फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने त्यांच्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आल्याची टीका झाली होती. पण आता भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर 'विशेष पोलीस आयुक्त' पदाचे काय होणार असा सवाल विचारला जात होता.

अखेर, गृहविभागाने या पदाची श्रेणी कमी करून त्याऐवजी सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता/इंटेलिजन्स) असे नवे पद निर्माण केले आहे. मुंबई पोलिस दलातील हे सहावे सहआयुक्त पद आहे. सध्या मुंबई पोलिस दलात कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, प्रशासन, आर्थिक गुन्हे आणि वाहतूक या विभागांचे पाच सहपोलिस आयुक्त आहेत.

गुप्तवार्ता यंत्रणेचे बळकटीकरण व प्राप्त गुप्तवार्ताचे निरंतर सूक्ष्म पर्यवेक्षण करणे. महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा व्यवस्था, व्हीआयपी सुरक्षा करणे. भारतासह अन्य राष्ट्रांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे आदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या मुंबई भेटीदरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सहआयुक्तांकडे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT