
Pune News: पुण्यातील गुंड गंजा मारणे याच्यासोबत मटण पार्टी करणं पुणे पोलिसांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यासह चार पोलिसांचे निंलबन करण्यात आले आहे. मोका अंतर्गत गजा मारणे सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला काही महिन्यापूर्वी सांगली कारागृहात घेऊन जात असताना हा प्रकार घडला.
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहाकडे जात असताना रस्त्यात एका ढाब्यावर गजा मारणे याने पोलिसांना मटणाचं जेवण दिले. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
एखाद्या आरोपीला एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवत असताना पोलिसांना काही प्रोटोकॉल आणि नियम पाळावे लागतात, एका गुन्हेगारासोबत ढाब्यावर मटणावर ताव मारुन पोलिसांनी हे नियम धाब्यावर बसवले का? अशी चर्चा सुरु आहे. पोलिसांसमोर हा मटण पार्टीचा प्रकार घडला आहे.
आरोपीला धाब्यावर जेवण देणे, बेजबाबदारपणे वागल्यामुळे पोलिसांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी धाब्यावर आलेल्या त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुणे परिसतातील गुन्हेगारी विश्वामध्ये गजानन मारणेची मोठी दशहत आहे.
पुण्याचे मालक, महाराज,गजा मारणे अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध असल्याचे बोलले जाते
कोथरुड भागात गजा मारणे टोळीची मोठी दहशत आहे.
मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून तो गुन्हेगारीकडे वळला.
जमीन मालक,बिल्डर यांच्यामधील दुवा म्हणून गजा मारणे काम करु लागला.
पप्पू गावडे आणि अमोल बुधे हत्या प्रकरणात तो जवळपास तीन वर्ष येरवडा जेलमध्ये होता.
त्यानंतर त्याची नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.
खंडणी, मारहाण, हत्या, हत्येचे प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे गजा मारणेवर आहेत.
पत्नी जयश्री मारणे या राजकारणात सक्रिय होत्या. 2012 ते 2017 मध्ये त्या मनसेकडून नगरसेविका होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.