Mumbai News, 22 Aprl : लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून राज्यासह देशभरात विरोधी पक्षांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. भाजपकडून असाच एक मोर्चा मंगळवारी मुंबईत काढण्यात आला होता. मात्र, भाजपच्या या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
या वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या एका महिलेने थेट भाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरक्ष: धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांनी देखील सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करायला सुरूवात केली आहे. तर आता याच सर्व प्रकरणावर खुद्द गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानातून सुरुवात झालेला भाजपचा हा जन आक्रोश मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळं जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळं संतप्त झाली आणि या महिलेने थेट मंत्री महाजन यांना यांना धारेवर धरलं.
या महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडिमार केला. ती म्हणाली, 'तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?' असे अनेक प्रश्न या महिलेने महाजनांना सर्वांसमोर विचारले.
संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील अनेक प्रश्न विचारले. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात? असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला होता आता याच सर्व प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाजन म्हणाले, "काल आम्ही महिलांसाठीच, महिला आरक्षणला विरोध करणाऱ्या काँग्रेसविरोधात हा मोर्चा काढला होता. जेव्हा मोर्चा काढतो तेव्हा रस्ता बंद होतो. त्यामुळे त्याचा त्रास साहजिकच लोकांना होतो हे मी मान्य करतो. कालच्या मोर्चाचा त्रासही लोकांना झाला. मात्र, यासाठी तुम्ही तिथं येऊन काहीही बोलता हे योग्य नाही.
काल त्या महिलेनं संताप व्यक्त करणं मान्य आहे. यासाठी मी तिथे त्यांना सॉरी देखील म्हणालो. शिवाय रस्ता दहा मिनिटांत रिकामा करतो असंही आम्ही त्यांना म्हटलं होतं. त्यांना त्रास झाला हे देखील मी मान्य करतो. पण त्यांनी बाटली फेकून मारली ते काय योग्य नव्हतं. त्यांची भाषा असंससदीय होती. त्या नको त्या भाषेत बोलत होत्या ते चुकीचं होतं. शिवाय आम्ही मोर्चाची परवानगी घेतली होती. आम्ही दिलेल्या मार्गाने जात होतो," अशा शब्दात महाजन यांनी कालच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.