Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनरची भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक झाली. या अपघातात फॉर्च्युनरमधील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य तिघे जण बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील पाचही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील रहिवासी आहेत. ते रात्री सुमारे दीड वाजता मुंबईच्या दिशेने जात असताना मिसिंग लिंकच्या बोगद्यात हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरनं मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याचं दिसत आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे पथक आणि देवदूत पथक घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य करत जखमी व्यक्तीला वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने जुन्या मार्गावरून वळवण्यात आली. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. तर मिसिंग लिंकवर याआधाही अपघात झाले आहेत. मात्र, पहिल्यांदाच या मिसिंग लिंकवरील अपघातात कोणाचा तरी बळी गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.