TET latest update : शिक्षक पदोन्नतीचा मार्ग पुन्हा लांबणीवर? TET उमेदवारांना मोठा धक्का; वाचा काय आहे नवीन अपडेट!

TET mandatory rule for teacher promotion Maharashtra : महाराष्ट्रातील शिक्षक पदोन्नतीचा मार्ग पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. TET उमेदवारांसाठी नवीन अपडेट, नियम आणि त्याचा परिणाम जाणून घ्या.
TET exam
TET examSarkarnama
Published on
Updated on

Teacher promotion latest news : शालेय शिक्षण विभागाने २९ जुलैला निर्णयाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली होती. यामुळे काही महिन्यांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याची आशा शिक्षकांना होती. मात्र त्यावर आता महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिक्षकांना आशा लागून राहिलेल्या या पदोन्नती आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यामुळे सहा महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ऑगस्टमध्ये होणाऱ्या पदोन्नतीची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील हजारो शिक्षकांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

TET exam
Abhijeet Dipke : PM मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात सर्वात कळीचा मुद्दा बोलणार? CJP ने दिलं उघड चॅलेंज, GenZ ला सांगितला सगळा प्लॅन

आता शिक्षण विभागाच्या या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने २९ जुलै रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील अंमलबजावणीस स्थगिती दिली. न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेत, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीबाबतची कार्यवाही शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

पदोन्नती प्रक्रियेला कायदेशीर स्थगिती मिळाल्यामुळे शिक्षकांत नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाचा पुढील आदेश कधी येणार आणि पदोन्नतीचा तिढा कधी सुटणार, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. टीईटी परीक्षेची तारीख अनिश्चित २८ जून रोजी टीईटी परीक्षा होणार होती. परंतु, त्यापूर्वीच टीईटीचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द केली. अद्याप या परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही. जूनमध्ये होणारे परीक्षेसाठी शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुटीत अभ्यास केला होता; परंतु परीक्षाच रद्द झाली. याचा धक्का शिक्षकांना बसला आहे.

TET exam
BLO FIR Quashed : BLO कर्तव्यावरून दाखल गुन्हा रद्द; अध्यापनाच्या वेळेत शिक्षकांना निवडणूक कामे, उच्च न्यायालयाचे ताशेरे

टीईटीबाबत संभ्रम सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार शासनाने पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निकालानुसार ३ सप्टेंबर २००१ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटीची सक्ती असणार नाही, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे टीईटीची सक्ती नेमकी कोणाला? हाही संभ्रम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com