5 dead after passengers fall from fast local near Mumbra Sarkarnama
मुंबई

Mumbai Railway Accident : मुंबईत मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रॅकवर पडले, तब्बल 6 जणांचा मृत्यू!

Mumbai Local Train Accident: लोकलच्या दारात प्रवासी उभे होते. मात्र,पुष्क एक्सप्रेस आणि लोकल एकमेकांना घासली. त्यामुळे 8 ते 10 प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडले.

Roshan More

Mumbai Train Tragedy: मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात उभे असलेले तब्बल प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडून सहाजणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे प्रशानाकडून आठ जणांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकवर पडल्यानंतर या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिकेद्वारे कळव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकलच्या दारात प्रवासी उभे होते. मात्र, मुंब्रा ते दिव्या स्थानकांच्या दरम्यान पुष्पक एक्सप्रेस आणि लोकल एकमेकांना घासली. त्यामुळे 8 ते 10 प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडले. टिटवाळ्याहून सीएसटीच्या दिशेने जाणारी ही फास्ट ट्रेन होती. सकाळी लोकलमध्ये गर्दी होती. आठ जण जखमी झाल्याची माहिती असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगितले जात आहे.

मुंब्रा ते दिवा या दरम्यान लोकलमध्ये मोठी गर्दी असते. नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी प्रवासी लोकलला लटकून प्रवास करतात. यापूर्वी देखील प्रवासी खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पहिल्यांदा येवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी खाली पडल्याचे सांगितले जात आहे.

9 च्या दरम्यान घडली घटना

साधारण 9 ते 9.15 च्या दरम्यान ही घटना घडली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतून पडलेल्या आठ जण जखमी आहेत त्यांना शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे नेण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT