Mumbai News: काही दिवसांपूर्वीच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे वर्चस्व असलेल्या एसटी बँकेच्या 72व्या वार्षिक अहवालातील फोटोवरून वाद पेटला होता. एसटी बँकेच्या (Mumbai ST Bank) अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आल्यामुळे हा वादंग निर्माण झाला होता. याचदरम्यान, आता पुन्हा एकदा एसटी बँक चर्चेत आली आहे.
मुंबई एसटी बँकेत बुधवारी(ता.15 ऑक्टोबर)एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत मोठा राडा झाल्याचं समोर येत आहे. यावेळी अॅड.गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांच्या संचालकांमध्ये वादावादी झाली.या वादावादीचं रुपांतर हाणामारीत झाले. एकमेकांवर माईक फेकण्यात आल्याचीही माहिती समोर आले.
आता या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.अॅड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांच्या गटाकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याचवेळी महिलांसमोर अश्लील हावभाव करण्यात आल्यामुळेच हा वाद पेटला होता. या हाणामारीत दोन तीन संचालक जखमी झाल्याचंही समोर येत आहे.
मुंबई सुरू होती एसटी महामंडळाच्या संचालकांची बैठक सुरू होती. या बैठकीत सदावर्ते गटाच्या संचालकांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न विरोधी शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांच्या गटाकडून करण्यात आला. तसा ठरावही संचालकांच्या बोर्ड मीटिंगमध्ये मांडण्यात आला. म्हणूनच सदावर्ते गटाकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आडसूळ गटाकडून देण्यात आली आहे.
यावेळी सदरची माहिती आणि भ्रष्टाचार बाहेर जाईल, या भीतीने सदावर्ते गटाच्या संचालकांनी आमच्या संचालकांवर हल्ला केला असल्याचा आरोपही आडसूळ गटानं यावेळी केला आहे.तर लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संचालक बैठकीत आल्याचा जाब विचारल्यामुळे मारहाण झाल्याचा आरोप सदावर्ते गटानं केला आहे.
एसटी बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल निवडून आल्यापासून सातत्याने वाद निर्माण होत आहेत. सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ आणि कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. त्यातून आता एक नवा वाद पेटला आहे. यापूर्वी सदावर्ते यांच्या पॅनेलवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही करण्यात आले आहे.
एसटी बँकेचा अर्थात, स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेचा 72वा वार्षिक अहवालातील फोटोवरून नवीन वादाला तोंड फुटलं होतं. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एसटी बँकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आला होता.
या अहवालात छापलेल्या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीसह इतरांचेही फोटो आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.