BJP’s Surgical Strike : निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का, कोल्हेंनी दादांपासून ज्या नेत्याला तोडलं, आता भाजपने त्याला आपल्याकडे ओढलं

local Body elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढविण्याकडे लक्ष घातले आहे. पुणे जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवताना आधीच अनेक बडे नेते पक्षात घेतले.
 Amol kolhe  Ajit Pawar
Amol kolhe Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा राजकीय डाव खेळला आहे.

  2. खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे माजी सहकारी शेखर पाचुंडकर यांना फोडले त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  3. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळाली आहे.

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरात भाजपने आधीच अनेक बडे नेते पक्षात घेतले असतानाच, आता भाजपने पुणे ग्रामीणमध्येही आपला मोर्चा वळवला आहे. भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट करत कधीकाळी राष्ट्रवादीचा गड असलेला जिल्हाच ताब्यात घेण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने, भाजपने जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत खासदार अमोल कोल्हे यांनी वर्षभरापूर्वी अजित पवारांच्या फोडलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला आहे. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठे नाव असलेले शेखर पाचुंडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शेखर पाचुंडकर यांनी अजित पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकत अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना आंबेगाव तालुकाध्यक्ष पदही बहाल झाले होते. मात्र आता वर्षभरातच पाचुंडकर यांनी तुतारीची साथ सोडत हाती कमळ घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

 Amol kolhe  Ajit Pawar
Local Body Elections : दिवाळीतच निवडणुकीचे फटाके! पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपची मजबूत चाल! माजी मंत्र्यांचीही तगडी फिल्डिंग

शेखर पाचुंडकर हे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. मात्र गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अमोल कोल्हे यांनी पाचुंडकर यांना गळाला लावत अजित पवार आणि वळसे पाटील यांना मोठा धक्का दिला होता. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मोठे नाव असलेले पाचुंडकर यांचे शिरूरच्या 42 गावांमध्ये मोठे वलय आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर ते आंबेगावचे तालुकाध्यक्ष झाले होते. मात्र वर्षभरातच त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले शेखर पाचुंडकर आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंडकर यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

"सर्वार्थाने सुसंस्कृत असणाऱ्या आमच्या तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गुंडगिरी आणि धाकदपटशाहीचा प्रभाव वाढला आहे. समाजातील सर्वच घटकांना या गुंडगिरीचा तिटकारा होऊ लागला आहे. या सगळ्या घटकांचा आवाज म्हणून आम्ही आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत." – असं म्हणत प्रवेशावेळी पाचुंडकर यांनी एकाच वेळी दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांवरही निशाणा साधला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता पुन्हा एकदा एका नव्या तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद पाहायला मिळू शकतो.

 Amol kolhe  Ajit Pawar
Local Body Election : धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत, इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

FAQs :

1. शेखर पाचुंडकर कोण आहेत?
शेखर पाचुंडकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकर्ते आणि प्रभावशाली स्थानिक नेते आहेत.

2. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला?
स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

3. या प्रवेशावेळी कोण उपस्थित होते?
भाजप खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

4. यामुळे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
या घडामोडीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसून भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

5. या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
हा प्रवेश जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो, कारण स्थानिक समीकरणात बदल अपेक्षित आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com