Mumbai University
Mumbai University  Sarkarnama
मुंबई

Mumbai University : सिनेट निवडणूक कधी ? ; वातावरण तापलं, ठाकरे गटाचे पदाधिकारी कुलगुरुंच्या भेटीला..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) परीक्षांचे गोंधळ तर कधी वेळापत्रकात गोंधळ तर कधी हॉल तिकीटाचे गोंधळ सुरू असतो, त्यात मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक कधी होणार, असा प्रश्न युवासेनेनं (ठाकरे गट) विचारला आहे.

सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू होऊन तीन वेळा मतदार नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली. 12 जानेवारीला ही मतदार नोंदणीची मुदत संपली असताना सुद्धा अद्याप निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर न केल्याने निवडणुका कधी होणार, असा प्रश्न युवासेनेचे विद्यापीठ प्रशासनाला केला आहे.

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठ प्रभारी प्र-कुलगुरु डॉ.अजय भामरे आणि कुलसचिव डॉ.सुनिल भिरुड यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच लवकरच होऊ घातलेल्या सिनेट निवडणुकीबाबत चर्चा केली. विद्यापीठातील सुरू असलेला गोंधळ पाहता विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सिनेट सदस्य असणे गरजेचे आहे, असे सरदेसाई म्हणाले.

सिनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे, हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत जो बाजी मारेल त्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नाही, हे स्पष्ट झाले आहे. सिनेट निवडणुकीत हे तिघंही मोठं ताकदीनं उतरणार आहेत.

या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची सिनेट निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. सिनेट निवडणुकीत सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT