Mumbai University Senate Elections news  Sarkarnama
मुंबई

Mumbai University Senate Elections : आदित्य ठाकरे-अमित ठाकरे भिडणार ; मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कस लागणार

Mumbai University News : 10 सप्टेंबरला ही सिनेट निवडणूक होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आपण पाहिले आहेत. आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही भाऊ मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहे. निवडणुकीत दोन्ही भावांचा कस लागणार असल्याचे बोलले जाते.

आतापर्यंत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पाहायला मिळते. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही पहिली सिनेट निवडणूक आहे, त्यामुळे येथील समीकरणे बदलली आहेत.

निवडणुकीत आदित्य आणि अमित ठाकरे भिडणार असून या निवडणुकीत दोन्ही भावांची ताकद पाहायला मिळणार आहे. आदित्य आणि अमित यांनी निवडणुकीत मैदानात उतरून जोरदार षड्डू ठोकणार आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 10 सप्टेंबरला ही सिनेट निवडणूक होणार आहे. शिंदे गट आणि भाजप हे या निवडणूकीत जोर लावणार असल्याची चर्चा आहे. यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील भर पडली आहे. आगामी काळात राजकारणात पाय रोवून उभं राहायचं असेल तर सिनेट निवडणुकीत ताकद दाखवणं अमित ठाकरे यांच्यासाठी गरजेचं आहे.

  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट आहे.

  • अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत आहे.

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे.

  • 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

  • 10 सप्टेंबर रोजी मतदान असून 13 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT